न. प. निवडणुकीसाठी बूथवर लक्ष केंद्रित करा – खा. पटोले

0
13

भाजप गोंदिया शहर विस्तारित बैठक
अनेकांचा भाजपा प्रवेश
गोंदिया,दि.11 – मागील नगर परिषद निवडणुकात पक्षाला चांगले यश मिळाले होते, मात्र बहुमत मिळू शकले नव्हते. शहराची स्थिती आता बदलू लागली आहे. नगर परिषद आता कुणाच्या घरून चालत नाही, विकास दिसू लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात देश व राजय प्रगती पथावर अग्रेसर झाले आहे. संपूर्ण विश्वात मोदीजींनी देशाचा सन्मान वाढविला आहे. केंद्र व राज्य शासनाने अनेक लोककल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत. या योजना जनतेपर्यंत पोहचवून त्याचे लाभ त्यांना देण्याकरिता कार्यकर्त्यांनी काम करावे. गोंदिया शहराला विकासाकडे नेण्याकरिता प्रत्येक कार्यकर्त्यांनी जोमाने काम करण्याची गरज आहे. येणाऱ्या नगर परिषद निवडणुकीत ४२ जागेवर यशस्वी होण्याकरिता प्रत्येक बूथ मजबूत करावयाचे आहे. निवडणूक जिकंण्याकरिता बूथ जिकने महत्वाचे असते या करिता बूथ कमेटीची मजबूत रचना तयार करावी असे आवाहन खासदार नानाभाऊ पटोले यांनी कार्यकर्त्यांना केले. ते १० जुलै रोजी येथील अग्रसेन भवनात घनश्यामदास केलनका सभागृहात आयोजित भाजपा गोंदिया शहराच्या विस्तारित बैठकीत बोलत होते.
शहर अध्यक्ष सुनील केलनका यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंचावर प्रामुख्याने जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, वि.एस.अग्रवाल, नगराध्यक्ष कशिश जायस्वाल, जिल्हा महामंत्री भाऊराव उके, रविकांत बोपचे, जिल्हा संपर्क प्रमुख संतोष चौहान, संजय कुलकर्णी, न. प. सभापती बंटी पंचबुद्धे, शोभाताई चौधरी, धंनजय तुरकर, दीपक कदम, मनोहर आसवानी, महेश आहुजा, विनोद किराड, मैथीली पुरोहित, रतन वासनिक उपस्थित होते.
या वेळी जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांनी कार्यकर्त्यांना आगामी नगर परिषद निवडणुकीकरिता प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपल्या क्षेत्रात कामाला गती द्यावी, केंद्र व राज्य सरकारने शहराच्या विकासाकरिता मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. अनेक कामे झालेली असून अनेक सुरू आहेत, याची माहिती घरा घरात पोहचविण्याचे आवाहन केले.नगराध्यक्ष कशिश जायस्वाल, न. प. सभापती बंटी पंचबुद्धे यांनी मार्गदर्शन केले. शहर अध्यक्ष सुनील केलनका यांनी आपल्या प्रास्ताविकात ताकदीनिशी लढायचे असल्याने नियोजनबद्ध पद्धतीने कार्य करणार असे सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन शहर महामंत्री राजा कदम यांनी तर आभार महामंत्री कुशल अग्रवाल यांनी मानले.