विलास राऊत व मोहसिन खान यांचा भाजपला रामराम

0
11

गोंदिया,दि.4-भारतीय जनता पक्षात गेल्या काही महिन्यापुर्वीच सहभागी झालेले बहुजन समाज पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष विलास राऊत व बसपचे भाईचारा कमिटीचे पदाधिकारी राहिलेले मोहसिन खान यांनी अखेर विचारसरणी आणि देशातील इतर राज्यात दलितसमाजावर होत असलेला अन्याय बघून भारतीय जनता पक्षाचा सदस्यत्वाचा राजीनामा जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांच्याकडे सोपवला आहे.भाजपचे राज्यातले व केंद्रातले सरकार दलित समाजावरील अन्याय अत्याचार रोखण्यात अपयशी ठरत असल्याने आपण या पक्षात राहू शकत नसल्याचे राऊत यांनी दिलेल्या राजीनामा पत्रात उल्लेख केला आहे.गेल्या वर्षभरापुर्वी यांनी बहुजन समाज पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता.