गोंदिया,दि.२७ः जिल्ह्याचे पालकमंत्री इंद्रनील नाईक यांच्या गोंदिया आगमनाच्या निमित्ताने खासदार प्रफुलभाई पटेल यांच्या पाल चौक स्थित जनसंपर्क कार्यालयात माजी आमदार राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष प्रेमकुमार रहांगडाले तसेच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
या प्रसंगी पालकमंत्री नाईक यांना गोंदिया जिल्ह्यातील विविध स्थानिक समस्या अवगत करून देण्यात आल्या. विशेषतः अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, प्रलंबित बोनसचा प्रश्न, तसेच रब्बी हंगामातील उर्वरित धानाच्या चुकार्यांचा विषय यावर चर्चा करून तातडीने कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.





