28.7 C
Gondiā
Friday, August 7, 2026
Home राजकीय मुनेश रहांगडाले यांचे संचालक पद कायम

मुनेश रहांगडाले यांचे संचालक पद कायम

0
124

गोंदिया, ता.24 ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा पंचायत समितीचे सभापती मुनेश रहांगडाले यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेली तक्रार पूर्णतः निराधार असल्याची स्पष्ट झाली आहे. या प्रकरणी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, गोंदिया यांनी तक्रार फेटाळून लावत मुनेश रहांगडाले यांचे संचालक पद कायम ठेवण्याचा आदेश दिला आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक धनलाल बालचंद ठाकरे यांनी मुनेश रहांगडाले यांच्याविरुद्ध जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीत रहांगडाले हे शेतकरी नसल्याचा तसेच त्यांच्या उत्पन्नाचा योग्य स्रोत नसल्याचा आरोप करत महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती नियम २०१७ मधील नियम १० (३) अंतर्गत त्यांचे संचालक पद रद्द करण्याची मागणी केली होती.
या तक्रारीवर सुनावणी करताना जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था गोंदिया अर्चना माळवे यांनी दोन्ही पक्षांचा सविस्तर युक्तिवाद ऐकून घेतला. सर्व कागदपत्रे, पुरावे व कायदेशीर बाबींचा अभ्यास केल्यानंतर त्यांनी स्पष्ट आदेश देत धनलाल ठाकरे यांनी दाखल केलेला तक्रार अर्ज फेटाळून लावला व मुनेश रहांगडाले यांचे संचालक पद कायम ठेवण्याचा निर्णय दिला.
या प्रकरणात मुनेश राहांगडाले यांच्या वतीने ॲड. वाय. एम. पारधी यांनी प्रभावी व ठोस युक्तिवाद सादर केला. तसेच या प्रकरणात ॲड.पी. सी. चव्हाण व ॲड. विश्वनाथ रहांगडाले यांनी वेळोवेळी सहकार्य केले.