शेतकरी विरोधी भाजपसरकारचा काँग्रेस मेळाव्यात धिक्कार

0
10

berartimes.com साकोली,दि.28- साकोली तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने आयोजित(दि.27) काँग्रेस मेळाव्याला तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर, काॅग्रेस कार्यकर्ता आणि पदाधिकार्यासंह उपस्थिती लावली होती.या मेळाव्यात राज्यातील व केंद्रातील भाजप सरकारवर धानउत्पादक शेतकरी,शेतमुजरासोबंत धोका दिल्याचा आरोप करीत भाजपचे सरकार कुचकामी ठरल्याचा आरोप वक्त्यांनी केला. जिल्ह्यातील शेतकर्यावर एकीकडे निसर्ग कोपला असतांना दुसरीकडे शासनसुध्दा शेतकर्यावर कोपला आहे. निवडणूकीपुर्वी शेतकर्यांना भूलथापा देऊन सत्ता हस्तगत केली.आणि दिलेली आश्वासने हवेत विरली. शेतकर्याच्या दयनिय अवस्थेला शासनच कारणीभूत असल्याचे मत सेंदुरवाफा येथील मंगलमुर्ती सभागृहात आयोजीत मेळाव्या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना डाॅ. अजय तुमसरे यांनी व्यक्त केले.

डाॅ. तुमसरे आणी तालुका काँग्रेस अध्यक्ष नंदु समरीत यांच्या नेतृत्वात एक हजाराच्यावर भाजप,सेना,राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांनी काॅग्रेस पक्षात प्रवेश घेतला.माजी मंत्री बंडूभाऊ सावरबांधे यांनीही भाजप सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळेच शेतकर्याच्या आत्महत्या मध्ये वाढ होत असल्याचे विचार व्यक्त केले.तर काॅग्रेस जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणविर यांनी पक्ष बळकट करणायाचे आवाहन केले.यावेळी प्रदेश सचिव प्रमीला कुटे, माजी जिल्हाध्यक्ष मधुकर लिचडे,अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष अणीकभाई जमा, शहर अध्यक्ष अश्विन नशीने,साकोली विधानसभा यु. काॅ. अध्यक्ष विष्णू रणदिवे जि.प. सदस्य होमराज कापगते, अशोक कापगते, रमेश डोंगरे ईतर मान्यवर उपस्थित होते.या मेळाव्याला तालुक्यातील पाच हजारावर पदाधिकारी,कार्यकर्ते,शेतकरी उपस्थित होते.याच मेळाव्यात भंडारा जिल्हा काँग्रेस पक्ष विधानपरिषदेच्या निवडणुकीत आघाडीचा धर्म पाळत पक्ष जो आदेश देईल त्याप्रमाणे काम करण्याचे विचार मांडण्यात आले.