गोंदिया,दि.१३-राष्ट्रवादी काँग्रेस किसान सेल गोंदिया जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ता बैठक राष्ट्रवादी काँग्रेस भवन, रेलटोली कार्यालय गोंदिया येथे दिनांक १६/०३/२०२६ सोमवारला दुपारी २.३० वाजता आयोजित केली आहे. खासदार प्रफुल पटेल यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रवादी काँग्रेस किसान सभेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ऍड. वसंत मनकर, माजी आमदार राजेंद्र जैन, आमदार राजकुमार बडोले, विदर्भ समन्वयक जगदीश जुनघरी, जिल्हाध्यक्ष प्रेमकुमार रहांगडाले प्रमुख उपस्थितीमध्ये बैठक संपन्न होणार आहे.तरी राष्ट्रवादी काँग्रेस किसान सभेच्या जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी व कार्यकर्ता तसेच सर्व तालुका अध्यक्ष आणि जिल्हातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व प्रमुख आघाडी आणि सेलच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन किसान सेल जिल्हाध्यक्ष योगेंद्र भगत यांनी केले आहे.





