मोहाडी, दि.२५ जून : मोहाडी पंचायत समितीचे सभापती जगदीश शेडे आणि उपसभापती देवा चकोले यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव आज(दि.२५)च्या विशेष सभेत बहुमताने पारित झाला.विश्वास ठरावाच्या बाजूने 10 मते, तर विरोधात केवळ 3 मते पडली.त्यामुळे दोन्ही पदाधिकान्यांना आपल्या पदावरुन पायऊतार व्हावे लागले आहे.या निकालामुळे मोहाडी पंचायत समितीतील सत्तासमीकरणे पूर्णपणे बदलण्यांची शक्यता निर्माण झाली असून पुढील सभापती व उपसभापतीपदी कुणांची निवड होतेय,याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे.अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर ठरावाला पाठिंबा देणार्या सदस्य व समर्थकांनी आनंद व्यक्त केला. काही ठिकाणी समर्थकांनी एकमेकांचे अभिनंदन करत जल्लोषही केला. दुसरीकडे, या निकालामुळे शेडे-चकोले समर्थकांमध्ये नाराजीचे वातावरण असल्याचे दिसून आले.दरम्यान, पंचायत समितीतील रिक्त झालेल्या सभापती व उपसभापती पदांसाठी लवकरच निवडणुकीची प्रक्रिया पार पडण्याची शक्यता आहे.





