23.8 C
Gondiā
Tuesday, August 11, 2026
Home राजकीय शहर काँग्रेस अध्यक्ष तिवारी भाजपात

शहर काँग्रेस अध्यक्ष तिवारी भाजपात

0
17

गोंदिया,दि.15-नगपरिषद निव़डणुकीच्या एैन तोंडावर तिरोडा शहर काँगेस् अध्यक्ष व नगरसेवक देवेंद्र तिवारी यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने तिरोड्यातील उरलीसुरली काँग्रेसही संपल्याचे बोलले जात आहे.तिवारी यांनी नवनिवर्चित विधानपरिषद सदस्य डाॅ.परिणय फुके यांच्या उपस्थीतीत भाजपमध्ये प्रवेश केला.तिवारी यांनी तिरोडा नगरपालिकेतील बोडी सौंदर्यीकरणाच्या कामात झालेला गैरव्यवहार समोर आणला होता.त्यावेळी गोंदिया जिल्हा काँग्रेसनही पाहिजे तशी मदत केली नव्हती.त्यातच ते आमदार गोपालदास अग्रवाल यांचे खास मानले जात होते.अग्रवालांचे आणि भाजपचे सध्या चांगलेच सुत जुळल्याने काँग्रेसमधील काही नेते आधीच भाजपमध्ये प्रवेश घेत आहेत हे तिवारी यांच्या भाजपप्रवेशावरुन स्पष्ट झाले आहे.

blank