नगरसेवक पंकज यादव कुटुंबियासह बसपात,नगराध्यक्षपदाचे उमेदवार

0
7

गोंदिया,दि.15-गोंदिया नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष व विद्यमान नगरसेवक पंकज यादव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत बहुजन समाज पक्षामध्ये कुटुबिंयासह प्रवेश केला आहे.पंकज यादव यांना गोंदिाय नगरपरिषदेच्या येत्या 8 जानेवारीला होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी बहुजन समाज पक्षाने नगराध्यक्षाचा उमेदवार जाहिर केला आहे.यादव यांचा भाऊ नगरसेवक कल्लू यादव आणि त्यांच्या कुटुबांतील सदस्यांनी गुरुवारला बसपमध्ये प्रवेश केला.त्यानंतर आज शुक्रवारला मिरवणुक काढत नगराध्यक्ष,नगरसेवक पदाचे अर्ज दाखल केले.यादव यानी काढलेली ही मिरवणूक नगराध्यक्षपदाच्या कांँग्रेस,भाजप व राष्ट्रवादीच्या उमेदवारांसाठी डोकेदुखी ठरणार आहे.यादव हे मागासवर्गीय समाजातील असून नगरपरिषदेत पदावर असताना स्वच्छतेसाठी त्यांनी पुढाकार घेतला होता.स्वच्छतेच्याबाबतीत त्यांनी घेतलेल्या पुढाकारामूळेच त्यांच्यासोबत काही वैयक्तीक मतभेद झाल्यानेच दोन गटात तणाव निर्माण झाल्याची चर्चा सुरु आहे.
राष्ट्रवादी काँगेसकडे त्यांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी मागितली होती परंतु त्यांना नकार देण्यात आले.तसेच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना जवळ करण्यापेक्षा काही मोजक्याच लोकांना ज्यांच्याकडे मतदान ओढून आणण्याची क्षमता नसते अशांना प्रमुख करुन त्यांच्यामार्फत निवडणुकीसह इतर कामाच्यावेळी नजर ठेवली जात होती हे आमच्यासारख्या काम करणार्याना कधीच पटले नव्हते.तरीही खा.पटेलाकडे बघूनच राष्ट्रवादीला सहकार्य केले होते परंतु आता आपण शहराच्या विकासासाठी व स्वच्छतेसाठी पारदर्शक प्रशासन चालविण्यासाठी बसपच्या माध्यमातून नगराध्यक्ष पदाची निवडणुक लढवित असल्याचे म्हटले आहे.