चिमूर बाजार समितीच्या सभापतीपदी माधव बिरजे

0
18

चिमूर दि.१९ :: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष माधव बिरजे तर उपसभापतीपदी नंदू पाटील गावंडे यांची अविरोध निवड करण्यात आली.
नुकत्याच झालेल्या निवडणुकीत डॉ. अविनाश वारजूकर यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाने निवडणूक लढविली होती. या निवडणुकीत १८ संचालकापैकी १३ संचालक काँग्रेसचे निवडून आले होते. तर भाजपा समर्थित चार संचालक व एक संचालक ईश्वर चिठ्ठीने निवडून आले होते. या संचालकाची सभापती व उपसभापतीची निवडणूक निर्णय अधिकारी बन्सोड यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. विरोधी गटाकडून कोणाचेच अर्ज न आल्यामुळे सभापतीपदी माधव बिरजे व उपसभापतीपदी नंदू पाटील गावंडे यांची अविरोध निवड झाली.

यावेळी बाजार समितीच्या वतीने सभापती, उपसभापती व संचालकांचे स्वागत करण्यात आले. निवडणूक झाल्यानंतर कार्यक्रम घेण्यात आला. यात माजी आ. डॉ. अविनाश वारजूकर, जि.प. सदस्य सतिश वारजूकर, शेंगरे, खरेदी विक्री संस्थेचे अध्यक्ष संजय डोंगरे, माजी सभापती घनश्याम डुकरे, प्रकाश बोकारे, गजानन बुटके, नारायण जांभुळे आदी उपस्थित होते.