गोव्यात काँग्रेसला मोठा धक्का, विश्वजीत राणेंचा राजीनामा

0
9

पणजी, दि. 16 – गोव्यात सर्वाधिक जागा जिंकूनही विरोधी पक्षात बसावे लागलेल्या काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. गोव्यातील काँग्रेसचे दिग्गज नेते आणि आमदार विश्वजीत राणे यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. गोव्यातील जनतेने जो कौल दिला त्याचा पक्षाने विश्वासघात केला असा आरोप विश्वजीत राणे यांनी केला. ते काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीमधील मुख्य दावेदार होते.विश्वजीत राणे काँग्रेसला सोडचिठ्ठी देतील अशी मागच्या दोन ते तीन दिवसापासून चर्चा होती. अखेर ती आज खरी ठरली. गोवा विधानसभेत आज मनोहर पर्रिकरांनी बहुमताची कसोटी जिंकली. गुरुवारी सकाळी त्यांनी 22 आमदारांच्या पाठिंब्यासह गोवा विधानसभेत बहुमत सिद्ध केले. 40 सदस्यांच्या गोवा विधानसभेत बहुमतासाठी 21 आमदारांचा पाठिंबा आवश्यक होता. 13 जागा जिंकणा-या भाजपाने अन्य छोटे पक्ष आणि अपक्षांनी मोट बांधून बहुमत सिद्ध केले.