हे तर दारूप्रेमी सरकार : सचिन सावंत

0
12

मुंबई दि.27- राज्यातील महामार्गालगतच्या 13 हजारांपेक्षा जास्त बिअर बार आणि परमिट रूमचे परवाने पुनर्स्थापित करण्याचा राज्य सरकारचा निर्णय म्हणजे, हे सरकार दारूप्रेमी असल्याचं निदर्शक आहे, अशा तीव्र शब्दात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी राज्य सरकारच्या निर्णयावर टीका केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने महामार्गालगतच्या दारूच्या दुकानावरती बंदी आणली . या अनुषंगाने महामार्गानजीकची सर्व बिअर बार, परमिट रूम आणि दारूची दुकाने बंद करण्याचा निर्णय झाला होता. दारूच्या नशेत वाहन चालवल्याने अपघात होऊन मृत्यूमुखी पडणा-यांची प्रचंड मोठी संख्या पाहता हा निर्णय स्वागतार्हच होता. परंतु बार आणि परमिट चालवणा-या संघटनेच्या दबावाखाली राज्य शासनाने बार आणि परमिट रूमचे परवाने पुर्नस्थापित करण्याचा निर्णय घेतला, असं सावंत म्हणाले.