जिल्हा कॉग्रेस कमेटीचे पोलीस अधिक्षकांना निवेदन

0
18

गोंदिया,दि.11-जिल्हा परिषदेच्या ३ एप्रिलच्या आमसभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या जि.प.सदस्या सुनिता मडावी यांचेकडून जि.प. सभापती पी.जी.कटरे यांचेवर करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर त्यांचेकडून अ‍ॅट्रासिटी अ‍ॅक्टअंतर्गत पोलीसांत तक्रार करण्यात आली. तेव्हा कॉग्रेसच्यावतीने जिल्हाध्यक्ष पुरूषोत्तम कटरे यांच्या नेतृत्वात खोटी अ‍ॅट्रासिटीची तक्रार दाखल करणाºया सुनिता मडावी यांचेवर कडक कारवाई करण्याची मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
निवेदनानुसार पी.जी.कटरे हे स्वच्छ प्रतिमेचे नेते असून ह्यापूर्वीसुद्धा ते सभापती राहीले आहेत. राजकारणात अनेक दिवसांपासून सक्रिय असताना त्यांचेवर गैरकायद्याचे काम करण्याचा दाग नाही. जि.प.सभापती झाल्यानंतर त्यांनी जिल्हा परिषद सभागृहात कोणत्याही जि.प.सदस्यांशी अभद्र व्यवहार केला नाही. याचा पुरावा म्हणून पीठासीन अधिकारी जि.प.अध्यक्षा उषाताई मेंढे, सीईओ डॉ.चंद्रकात पुलकुंडवार व अन्य उपस्थित अधिकारी व पदाधिकारी आहेत. मात्र त्यांची खोटी तक्रार दाखल करून दबाव निर्माण करण्यात येत आहे. परंतु कॉग्रेस पक्षाकडून निषेध करण्यात येत आहे. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ.भुजबल यांनी सांगितले, कोणत्याही निर्दोष व्यक्तींवर कारवाई करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पोलीसांकडे जी तक्रार आली आहे. त्या तक्रारीची निष्पक्ष चौकशी करून कारवाई करण्यात येईल. तेव्हा निर्दोष व्यक्तींनी भीती बाळगण्याची गरज नाही. निवेदन देतेवळी आमदार गोपालदास अग्रवाल, जिल्हा कॉग्रेसचे अध्यक्ष पुरूषोत्तम कटरे, डॉ.झामसिंग बघेले, जि.प.अध्यक्षा उषाताई मेंढे, डॉ.योगेंद्र भगत, प्रदेश कॉग्रेस प्रतिनिधी पृथ्वीपालसिंग गुलाटी, अमर वºहाडे, राजेश नंदागवळी, राधेलाल पटले, प्रकाश रहमतकर, राकेश ठाकूर, डेमेंद्र रहांगडाले, अशोक चौधरी, संदिप ठाकूर, जितेंद्र कटरे, आलोक मोहंती, टिनू पटेल, यादनलाल बनोटे, विशाल शेंडे, अरूण दुबे, सुशीला रहांगडाले, व्यंकट पाथरू, मनोज पटनायक, जगदिश येरोला,मनोज वालदे, दिल्लू गुप्ता, राहुल कटरे, सारंभ भेलावे,अमर रंगारी, आनंदराव बागडे, गेंदलाल कुंभरे, नरेश राऊत, भरत बोरीकर, पी.सी.चौव्हान, क्रांती जायस्वाल, पं.स.सभापती माधुरी हरिणखेडे, निता पटले,रमेश अंबुले, विजय लोणारे, शेखर पटले, सीमा मडावी, उषा सहारे, विजयकुमार टेकाम, लता दोनोडे, ज्योती वालदे, सरीता कापगते, दिपकसिंग पवार, माधुरी कुंभरे, गिरीष पालीवाल, शकील मंसुरी,दिपकसिंग पवार हे उपस्थित होते.