विस्तारक अभियानातून बूथ वरील प्रत्येक कुटुंबाशी संपर्क साधा : डॉ. कोठेकर

0
12
गोंदिया,दि.१६ मे -पं दीनदयालजी यांनी आपल्या संपूर्ण जीवनात जनसंघ व विचारधारेसाठी कार्य केले. ते एक कुशल संघटक व आदर्शवादी विचारवंत राजनेते होते. त्यांनी संघटना आणि सिंद्धांताच्या पायावर राजकारण केले. एकात्म मानवदर्शन व अंत्योदयाच्या त्यांच्या तत्वज्ञानावर भाजपा कार्य करीत आहे. पं. दीनदयाल उपाध्याय यांच्या जन्मशताब्दी निमित्त भारतीय जनता पार्टी विस्तारक अभियान राबवित आहे. या अभियानात विस्तारक म्हणून ज्यांना जवाबदारी मिळाली आहे त्यांनी २९ मे ते १२ जुन पर्यंतच्या १५ दिवसाच्या कालावधीत पुर्णवेळ द्यायचे असून बूथ वरील समितीच्या रचनेपासून तर प्रत्येक कुटुंबाशी संपर्क साधायचा आहे. तसेच सूचनेनुसार नियोजित कार्यक्रम करायचे असल्याचे विदर्भ संघटन मंत्री डॉ उपेंद्र कोठेकर यांनी  सांगितले.
भारतीय जनता पार्टीच्या पं. दीनदयाल उपाध्याय विस्तारक अभियान अंतर्गत १४ मे रोजी तिरोडा तालुक्यातील बोदलकसा येथील विश्रामगृहात आयोजित जिल्ह्याच्या विस्तारक व प्रमुख पदाधिकाèयांच्या कार्यविस्तार योजनेच्या प्रशिक्षण वर्गात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या बैठकीला पालकमंत्री ना. राजकुमार बडोले, विदर्भ संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, खा. नानाभाऊ पटोले, प्रदेश प्रवक्ते आ.गिरीश व्यास, आ.प्रा. अनिल सोले, आ. डॉ. परिणय फुके, आ. विजय रहांगडाले, आ. संजय पुराम, माजी खा. डॉ. खुशाल बोपचे, माजी आ.केशव मानकर, भजनदास वैद्य, खोमेशभाऊ रहांगडाले, भेरसिंहभाऊ नागपुरे, हरीश मोरे, अनुसूचित जाती प्रदेश अध्यक्ष व जिल्हा प्रभारी सुभाष पारधी, नागपुरच्या माजी महापौर अर्चना डेहनकर, श्रीकांत देशपांडे,नगराध्यक्ष अशोक इंगळे,रचनाताई गहाणे,नगराध्यक्ष सोनाली देशपांडे, वीरेंद्र अंजनकर,महामंत्री रविकांत बोपचे, लायकराम भेंडारकर आदी उपस्थित होते. प्रशिक्षण वर्गानंतर जिल्हा बैठक घेण्यात आली. यात जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांनी प्रास्ताविकेतून संघटनेचे महत्व सांगून प्रत्येक कार्यकत्र्याने निःस्वार्थपणे कार्य करण्याचे आवाहन केले. त्यांनी विस्तारक योजना, आजीवन निधी योजना, शिवार संवाद योजना संदर्भात माहिती देऊन जिल्ह्यातील समितीची घोषणा केली. तसेच  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या २७ मे ला नागपूर येथे साजरा होणाèया वाढदिवसाबाबद माहिती दिली. बैठकीचे संचालन वीरेंद्र अंजनकर यांनी केले तर आभार आमदार विजय रहांगडाले यांनी मानले.