अशोक चव्हाणांचे ‘माझी कर्जमाफी झाली नाही’ अभियानाला प्रारंभ

0
14

बुलडाणा,(विशेष प्रतिनिधी) दि.12- राज्य सरकारने कर्जमाफीसंदर्भात फसवे आणि खोटे आकडे देऊन राज्यातील शेतकऱ्यांची घोर फसवणूक केली आहे. सरकारचा खोटेपणा उघड करण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी काँग्रेसने आजपासून (बुधवार) ‘माझी कर्जमाफी झाली नाही’ हे राज्यस्तरीय अभियान बुलडाण्यातून सुरु केले आहे.दरम्यान हा कार्यक्रम सुरु होण्याआधी काँग्रेसचे खासदार अशोक चव्हाण यांच्या सभेच्या आधी काँग्रेस- भाजपचे पदाधिकारी आमोरासमोर आल्याने दोन गटात झालेल्या झटापटीत काँग्रेसचे कार्यकर्ते जखमी झाले आहे. तर भाजपच्या सभापती श्वेता महाले यांचे मंगळसूत्र तोडल्याची माहिती समोर आली आहे.कृषीमंत्री फुंडकरांनी पाठवलेले गुंड भाजपचेच असल्याचा आरोप आमदार बोंद्रे यांनी केला आहे.दरम्यान गर्दे हाॅलमध्ये काॅंग्रेस एल्गार माेर्चाच्या बैठकीपूर्वी जयस्तंभ चौकात भाजप कार्यकर्ते काॅंग्रेस नेत्यांचा निषेध करण्यासाठी काळे झेंडे घेऊन उभे हाेते. त्यांची जाेरात घाेषणा बाजी सुरू हाेती.याचवेळी काॅंग्रेसचे कायकर्त्यांनी ‘माेदी चाेर है..’ अशी घाेषणाबाजी सुरू केली. प्रकरण हाताबाहेर जात असल्याचे पाहून पाेलिसांनी बळाचा भाजप- काॅंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.