पिकविम्याची तारीख वाढवा,राष्ट्रवादीचे तहसिलदारांना निवेदन

0
9

अर्धापूर,दि.२० : – खरीप हंगामाचा पिकविमा भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलै असून २० टक्के लोकांनीही अजून पीकविमा भरलेला नाही. पंधरा दिवसाचा कालावधी वाढवून देवून राष्ट्रीयकृत बँकेत विमा घेण्यात यावा. अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने तहसिलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
अर्धापूर तालुक्यात सेतु सुविधा केंद्र व ग्रामस्तरावरील सुविधा केंद्रामध्ये पीकविम्याच्या प्रीमियमची रक्कम भरणे चालू आहे. सदरील केंद्रावर इंटरनेटची लाइन व्यस्त असल्यामुळे अर्ज अपलोड करण्यास वेळ लागत आहे. एक तर सेतु सुविधा केंद्रावर सात-बारा मिळत नाही. तसेच पेरणी व मशागतीचा हंगाम असल्यामुळे शेतकऱ्याला दिवसभर रांगेत उभे टाकणे अवघड होत आहे.
यासह सर्व अडचणी लक्ष्यात घेता हवामान आधारीत पिकविमा भरण्याची तारीख १५ दिवसांनी वाढवून देण्यात यावी. तसेच राष्ट्रीयकृत बँकेमध्ये पीक विम्याचे प्रीमियम भरण्यासाठी आदेशित करावे किंवा तलाठी सज्जा वर पीकविम्याचे प्रीमियम भरण्याची सुविधा उपलब्ध करुन द्यावी. जेणे करुन शेतकऱ्याना सहजपणे पीकविमा भरता येईल. वेळीच शासनाने या बाबत गांभीर्याने विचार करुन कार्यवाही न केल्यास आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अँड.किशोर देशमुख, विराज देशमुख, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत पाटील टेकाळे, तालुकाध्यक्ष शशिकांत क्षीरसागर, व्यकंटराव टेकाळे, नगरसेवक शिवराज जाधव, तुकाराम साखरे, आत्माराम कपाटे, शेख मुनीर भाई, विलास देशमुख, प्रसाद देशमुख, बाबुराव कपाटे, तुळशीराम बंडाळे, शेख जाकेर, विक्रम कपाटे, साईनाथ जाधव, अमोल कपाटे, शाकेर, गोविंद टेकाळे, भारत सूर्यवंशी, संतोष पवार, बालाजी सावंत, रामदास पवार, रघुनाथ दादजवार, सुधाकर सूर्यवंशी, बालाजी माटे आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत.