हत्या प्रकरणामुळेच नीतीश कुमारांचा राजीनामा- लालूप्रसाद

0
14

पटना- बिहारचे माजी मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्यावर हत्येचा आरोप आहे. त्यांचे राजीनामा देण्याचे आधीपासूनच ठरलेले होते. हत्येच्या प्रकरणातून आपण वाचणार नाही,याची नीतीश कुमार यांना चांगलीच कल्पना आहे. या सर्व बाबींमुळे त्यांनी राजीनामा दिला, असा गौप्यस्फोट राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालुप्रसाद यादव यांनी पत्रकार परिषदेत केला.नीतीश कुमार यांनी भाजप आणि आरएसएसशी हातमिळवणी केली असल्याचेही ते म्हणाले.
नीतीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत नीतीश कुमारांचे अभिनंदन केले. त्यानंतर नीतीश कुमारांना बिहारमध्ये सरकार स्थापण करण्याविषयी विचारले गेले तेव्हा नीतीश कुमार यांनी नकार दिलेला नाही याकडे ही लालुप्रसाद यादव यांनी लक्ष वेधले आहे.
जेव्हा आपला काहीच गुन्हा नसतो तेव्हा आपण राजीनामा देत नाही. नीतीश कुमार स्वत: कलम ३०२ प्रकरणातील आरोपी आहेत. नीतीश कुमारांनी एमएलसीसाठीच्या निवडणुकीत निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी खटल्याची माहिती दिलेली आहे असे म्हणत लालुप्रसाद यांनी या राजीनाम्याशी हत्येच्या प्रकरणाचा संबंध असण्याचा मुद्दा अधोरेखित केला