गोविंद तुरकर यांचा राष्ट्रवादीला रामराम

0
9

गोंदिया,दि.16-गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य व दासगाव किसान परिषदेचे अध्यक्ष गोविंद तुरकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी पक्षाची कणखर भूमिका पार पाडण्यात अपयशी ठरली असून शेतकरी व जनसामान्य शेतकरी वर्गाला कर्ज मिळवून देण्यात व दुष्काळाच्या परिस्थिती त्यांच्यासोबत राहण्याएैवजी गप्प राहण्याच्या भूमिकेमुळे आपण राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा देत असल्याचे तुरकर यांनी म्हटले आहे.प्रफुल पटेल चांगले नेते असले तरी त्यांच्या कार्याची त्यांच्यात व सामान्य जनतेत काहीमूळे चांगलीच दरी निर्माण झाली आहे.अशा परिस्थितीत काम करने कठीण असल्याचे सांगत आपण शेतकरी हितासाठी सदैव लढत राहणार असल्याचे म्हटले आहे.