सौरपंप नळ कामाचे मुल्यांकन झाले नसल्याने गैरव्यवहाराचा प्रश्नच नाही-सरपंच

0
6

गोरेगाव,दि.16- तालुक्यातील कटंगी बुजरुक येथे सन २०१६-१७ च्या विकास आराखड्यानुसार १४ व्या वित्त आयोगातुन ४लाख ७० हजार रुपयाच्या सौरपंप कामाची प्रशासकीय मंजुरी २२ मार्च ला घेण्यात आली व ई-निविदा ग्रामसेवक टी एच रहांगडाले यांनी काढुन कामास सुरुवात करण्यात आली. या सौरपंप ( दुहेरी) नळ जोडणी कामाचे मुल्यांकन झाले नाही.यामुळे या कामात गैरव्यवहार होण्याचा प्रश्नच नाही अशी माहीती सरपंच मुनेश्वरीबाई रहांगडाले यांनी कंटगीतील दुर्गामंदीर समाजभवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी उपसरपंच प्रेमलाल भगत, सदस्य भुपेन्द्र दिहारी, जिवनकला सिंगाडे, शांताबाई राऊत, तेजेन्द्र हरिणखेडे, डेमेन्द्र रहांगडाले व गावकरी उपस्थित होते. प्रभाग १ते३ मध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई होती.यामुळे सन २०१६ ला आमसभेत विकास आराखडा तयार करण्यात आला.यात बुधराम वळगाये यांच्या घरासमोर सौरपंप लावण्याचे ठरविण्यात आले व प्रशासकीय मंजुरी घेवुन ४ लाख ७० हजार रुपयांच्या कामाची ई-निविदा ग्रामसेवक टी एच रहांगडाले यांनी दिली. या कामात पाणीटाकी, पाईप टाकणे, नळ स्टॉण्डपोज तयार करणे, बोरवेल तयार करुन मोटार बसविणे आदी कामे सुरु करण्यात आली.या कामाचे मुल्यांकन झाले नाही तसेच बांधकाम अपुर्ण आहे, मुल्यांकन झाल्याशिवाय बिल काढता येत नाही, ई-निविदा ग्रामसेवकांनी दिल्याने या कामात गैरव्यवहार नाही माजी पं स सदस्य यांनी बिनबुडाचे आरोप केले अाहे.सौरपंप नळ योजना चंद्रपुरटोलीवर गाव विकास आराखडा विना लावण्यासाठी दबावतंत्राचा वापर करीत आहेत असे आरोप सरपंच मुनेश्वरीबाई रहांगडाले व उपसरपंच प्रेमलाल भगत, डेमेन्द्र रहांगडाले यांनी लावले आहेत.त्यांनी जिल्हा परिषद निधीतुन सौरपंप नळ योजना करावी व गावाचा विकास करावा असे सांगितले.