वाढत्या महागाई च्या विरोधात जिल्हा महीला कांग्रेसचे निवेदन

0
9

देवरी,दि:8 गोंदिया जिल्हा महीला कांग्रेस अध्यक्ष सौ. उषाताई शहारे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार (दि.07)रोजी भोला भवन गोंदिया येथे सभा पार पडली. या सभेनंतर जिल्हा महीला कांग्रेस च्या वतीने सतत वाढणारे गँस,पेट्रोल डिझेल यांच्या सह जिवनावश्यक वस्तू चे भाव सरकार ने नियंत्रणात आणावे या मागणीचे निवेदन उपजिल्हाधिकारी  प्रविण महीरे यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना  सादर करण्यात आले.या सभेच्या अध्यक्षस्थानी पक्षाच्या जिल्हा नियंत्रक सौ. बेबीताई गौरीकर ह्या होत्या. या प्रसंगी जि.प.च्या अध्यक्ष सौ.उषताई मेंढे, यांच्यासह जिल्ह्यातील पक्षाच्या सर्व जि.प.सदस्य,पं.स. सदस्य, सभापती,उपसभापती सरपंच आणि पक्षाच्या पदाधिकारी सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते. या सभेत पक्ष संगठन, ग्रामपंचायत निवडणूक, पक्षाचा आढावा आणी वाढती महागाई अशा अनेक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.