नागपूर प्रभाग पोटनिवडणुकीत भाजप विजयी

0
7

नागपूर,दि.12 : नागपूर महापालिकेच्या प्रभाग 35 अ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकित भाजप उमेदवार संदीप गवई विजयी झाले. त्यांनी कॉंग्रेसचे पंकज थोरात यांचा सहाशेवर मतांनी पराभव केला.या विजयासाठी भाजपाला कड़वी झुंज द्यावी लागली. भाजपाने येथे स्वीकृत सदस्यांसह 110 नगरसेवक व 4 आमदारांना प्रचारासाठी लावले होते. मात्र केवळ 24 टक्के मतदान झाले होते.