भाजप आमदार देशमुखांचे काळी फीत लावून आंदोलन

0
9

वाशिम,दि.06ः- कर्जमाफीची घोषणा करून आठ महिने लोटूनही अजून शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही.त्यामुळे निराशेपोटी रोज शेतकरी आत्महत्या होत आहेत.या बाबीचा व  सरकारच्या धोरणाचा निषेध काटोलचे भाजप आमदार आशिष देशमुख यांनी वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळ्या फिती लावून धरणे आंदोलन केले. त्यांच्या सोबत काँग्रेसचे आमदार अमित झनक सहभागी झाले होते. आमदार आशिष देशमुख त्यांनी सुरु केलेली  विदर्भ आत्मबळ यात्रा वाशिम जिल्ह्यात आली असता त्यांना किसन मस्के या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. त्यांनी लगेच कार्यकर्त्यासबोत जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन धरणे दिले. आमदार आशिष देशमुख हे आपल्या मुद्यांवर ठाम असून अनेकदा भाजप विरोधात जात त्यांनी भाषण केले आहे.