मुर्तिजापूर व पिंजर येथे निरिक्षक शिवहरेंनी घेतला पक्षाचा आढावा

0
15

मुर्तिजापूर,दि.22ः-शिवसेनेच्यावतीने  लोकसभा व विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसंपर्क अभियानांतर्गत चाचपणी तसेच शिवसेना पक्ष बांधणीच्या अनुषंगाने बुधवारला मुर्तिजापर व पिंजर येथे विधानसभा मतदारसंघाचे निरिक्षक तथा गोंदिया जिल्हाप्रमुख मुकेश शिवहरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकित पक्षबळकटीकरणासह विविध विषयावर चर्चा करण्यात आली.शिवहरे यांनी मतदारसंघातील नागरिकांसह कार्यकर्ते,व पदाधिकारी यांचीही भूमिका एैकून घेतली.यावेळी उपजिल्हाप्रमुखगोपाल दातकर,बंडू ढोरे,युवा सेना जिल्हा प्रमुख विठ्ठल सरप पाटिल, शिवसेना तालुका प्रमुख अप्पू तिडके,कुणाल पिंजरकर,अस्तीक चव्हाण,शहर प्रमुख विनायक गुल्हाने,गजानन चौधरी,छबीले पाटील,संगीत कांबे, आशीष बरे,युवासेना तालुक़ा प्रमुख शेखर मोरे, शहर प्रमुख देवशिश भटकर,अमोल सरप,शिवसेना व युवा सेना पदाधिका-यांची उपस्थिती होती.
यावेळी आयोजित आढावा बैठकीत बोलतांना निरिक्षक शिवहरे यांनी शिवसेनेच्या मतदार संघातील सर्व आजी-माजी पदाधीकारी व कार्यकर्त्यांनी एकत्रीत येऊन आगामी निवडणूक आपल्याला जिंकण्यासाठी काम करायचे आहे.पक्षात काम करत असताना आपण सर्वानी आपल्यातले अंतर्गत वाद संपवून मुर्तिजापुर विधानसभा मतदार संघातील ग्रामपंचायत , जिल्हा परिषद, नगर पंचायत भागातून येत्या  विधानसभेच्या निवडणूकीत आपल्या पक्षाचा उमेदवार कसा निवडून आणता येईल याचा संकल्प करुन मतदारसंघ भगवेमय करण्याचे आवाहन केले. हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी माझ्यासारख्या सामान्य एका कार्यकर्त्याला लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी दिली. पक्षात काम करत असतानी त्यावेळी आमच्या कडे गाडीही नसायची त्यावेळी आम्ही गावागावात जाऊन शिवसेनेचे विचार सर्वसामान्या जनते पर्यंत पोहचविण्याचे काम केले. तसेच काम आपल्या सर्वांना येणा-या लोकसभा व विधानसभा निवडणूकीत करायचे आहे. शेतक-यांचा प्रश्न असो किंवा सर्वसामान्य जनतेचा प्रश्न असो त्यावेळी त्यांच्यासोबत उभी राहते. शिवसेनेत काम करतांना कार्यकर्त्याची ओळख बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून असते आणि जे शिवसेना सोडून गेलेत त्यांनी प्रवेश केलेल्या पक्षाला कंटाळून झालेली चूक सुधारण्याचा प्रयत्न करीत शिवसेनेत यायला वाट बघत आहेत,त्यांनाही आपण सामावून घेतले पाहिजे असे आढावा बैठकित सांगितले.
भाजपा जाहिरातबाजीवर महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल करत आहे.येथे शेतकरी आत्महत्या करत आहे. त्यांच्याकडे शासन दुर्लक्ष करीत आहे, काही दिवसापूर्वी  विदर्भ मराठवाडयामध्ये गारपीट झाली.यामध्ये शेतक-यांच्या पिकांचे नुकसान झाले. परंतु शासनाकडून त्याना अद्यापही मदत करण्यात आलेली नाही. शासनाकडून शेतक-यांना किती कर्जमाफी मिळाली हे पाहण्याचे काम आपण सर्वांनी करुन भाजपचे मंत्री कर्जमाफीचे फक्त आश्वासन देत असल्याची टिका केली.शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी महाराष्ट्रात शिवसंर्पकं मोहिमेच्या माध्यमातून कार्यकर्ता,पदाधिकारी यांना एकत्रीत काम करण्याची संधी देत येत्या निवडणूका स्वबळावर जिकून महाराष्ट्रात भगवा फडकण्याचे काम,शेतक-यांना न्याय मिळवून देण्याचे काम आपल्या सर्वांना करायचे असल्याचे शिवहरे यांनी मुर्तिजापुर व पिंजर येथील सभेत आहवान केले आहे.