1 एप्रिल हा संघर्ष दिन म्हणून साजरा करा-राहुल पडघन

0
74
वाशिम,दि.29ः-मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढा लाँगमार्चचे प्रणेते,पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष देशातील तरूणांचे प्रेरणास्थान असलेले झुंजार नेते प्रा.जोगेंद्र कवाडे यांचा वाढदिवस 1 एप्रिल हा संघर्ष दिन म्हणून साजरा करावा असे आव्हान विद्यार्थी नेते राहुल पडघान यांनी केले आहे.
प्रा.कवाडे सरांनी आपल्या आयुष्यात अनेक संघर्ष केले.सामाजिक अन्याविरूद्ध लढून गरिबांना न्याय मिळवून देण्याचे कार्य विदर्भामध्ये चालु असताना त्यांनी आपल्या कार्याची सुरूवात नामांतराच्या लढ्याने केली.नागपुर या पविञ दिक्षाभूमी वरून 11नोव्हेंबर 1979 रोजी औरंगाबाद येथे लाँगमार्च काढुन त्यांनी आंबेडकरी चळवळीचा नव्याने इतिहास घडवीला प्रा.कवाडेंना अनेक जिल्ह्यामध्ये आंदोलन करतांना तुरुंगात सुध्दा जावे लागले तरीही त्यांनी आपले कार्य सातत्याने सुरुच ठेवले अशा जिद्दी व्यक्तीचा वाढदिवस हा प्रेरणादायी ठरावा यासाठी संघर्ष दिन म्हणून साजरा करण्यात यावे असे आवाहन पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे कार्यकर्ते विद्यार्थी नेते राहुल पडघन यांनी केले आहे.