दिल्लीकरांना १ मार्चपासून वीज-पाणी मोफत योजनेचा लाभ

0
9

नवी दिल्ली, दि. २५ – अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने दिल्लीकरांना निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता पुढील महिन्यापासून लागू होणार असून १ मार्चपासून दिल्लीकरांना २० हजार लीटर पाणी मोफत तसेच ४०० युनीटपर्यंत वीजेचा वापर करणा-या ग्राहकांना वीजबिलामध्ये ५० टक्के कपातीचा लाभ मिळणार आहे. या दोन्ही बाबींची घोषणा आज दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी एका पत्रकार परिषदेत केली.

दिल्ली विधानसभा निवडणूक लढविणा-या अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टींने दिल्लीत वीज व पाणी मोफत दिले जाईल असे दिल्लीकरांना निवडणूक जाहिरनाम्यात वचन दिले होते. आपने दिलेल्या वचनाला दिल्लीकरांनी चांगलाच प्रतिसाद दिला व दिल्ली विधानसभा निवडणुकीत ‘आप’ला ७० जागापैकी तब्बल ६७ जागेवर विजय मिळवून देत दिल्लीची एकहाती सत्ता सोपवली.