24.4 C
Gondiā
Sunday, August 9, 2026
Home राजकीय युवक कॉंग्रेसकडून वनमंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी

युवक कॉंग्रेसकडून वनमंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी

0
28

नागपूर,दि.05 ः भारतीय वन्यजीव अधिनियमाचे उल्लंघन करीत रात्रीच्या वेळी टी-वन वाघिणीची (अवनी) शिकार केल्याच्या आज युवक कॉंग्रेसतर्फे “टायगर कॅपिटल’ म्हणून फलक लावलेल्या सिव्हील लाईन्स परिसरात आंदोलन करुन वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली.असगर अलीकडे शिकारीचा परवाना नसताना वाघिणीची शिकार कशी केली. भारतीय जनता पक्षाकडून कायम वाघाच्या संवर्धनाचे नारे दिले जात असताना टी वन वाघिणीला मारण्याचे आदेश का दिले. तीला बेशुद्ध करुन जेरबदही करता आले असते. वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली. टी वन वाघिणीची शिकार हा खुनच आहे. यावरुन सरकार वन्यजीव वाचविण्यासही असमर्थ ठरत असल्याचे उघड झाल्यानेच आंदोलन करीत आहे. वनमंत्र्यांनी राजीनामा न दिल्यास आंदोलन तिव्र करण्यात येईल असा इशाराही युवक कॉंग्रेसचे दक्षिण महासचिव महेश बालपांडे आणि नागपूर युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष कुणाल पुरी यांनी दिला आहे.

blank