शेतकरी विरोधी केंद्र व राज्यसरकारच्या विरोधात एल्गार-नाना पटोले

0
7
गोंदिया,दि.२१ः- केंद्र व राज्यातील सरकार ही शेतकरी विरोधी असून त्यातही धानउत्पादक शेतकèयांवर अन्याय करणारी सरकार असल्याने या सरकारच्या विरोधात येत्या २7 तारखेला राज्याचे सामाजिक न्यायमंत्री यांच्या मतदारसंघातील अर्जुनी मोरगाव येथे एल्गार करीत शेतकरी आंदोलन करणार असल्याची माहिती अखिल भारतीय किसान खेतमजूर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार नाना पटोले यांनी दिली.ते गोंदिया येथे राष्ट्रीय किसान खेतमजदूर काँगे्रसचे अध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदाच आले असता पत्रकार परिषदेत बोलत होते.पत्रपरिषदेला जिल्हा काँग्रेसचे महासचिव अमर वराडे,राजीव ठकरेले,निलम हलमारे उपस्थित होते.
पुढे बोलतांना माजी खासदार नाना पटोले म्हणाले की,केंद्रात व राज्यात सत्तेवर येण्याआधी २०१४ च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या जाहिरनाम्यात शेतकèयांच्या धानाला २५०० रुपये प्रती qक्वटल मोबदला देण्याचे आश्वासन देण्यात आले होते.तसेच कर्जमाफीचा सातबारा कोरा करणार अशी घोषणा करण्यात आली होती.सत्तेवर आल्यानंतर मात्र आश्वासनाचा व आपल्या जाहिरनाम्याचा विसर पडणारा हा पक्ष असून शेतकरी विरोधी असल्याचे दाखवून दिले आहे.याउलट मध्यप्रदेश,राजस्थान व छत्तीसगडच्या निवडणुकीत काँग्रेसने आपल्या वचननाम्यात शेतकèयांचे कर्ज माफ करुन २५०० रुपये धानाला भाव देण्याची केलेली घोषणा सत्तेत येताच पुर्ण केली आहे.छत्तीसगड व मध्यप्रदेशमध्ये शेतकèयाच्या धानाला प्रति qक्वटल २५०० रुपये अधिक ३०० रुपये बोनस दिले जात आहे.तर महाराष्ट्रातील धान उत्पादक शेतकèयाला मात्र १७४० रुपये दराने धान शासकीय केंद्रावर विकावे लागत आहे.यावरुन भाजप हे शेतकरी विरोधी असल्याचेच स्पष्ट असल्याची टिका करीत भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकèयांना धानाला भाव मिळावा यासाठी येत्या २7 डिसेंबरला अर्जुनी मोरगाव येथे भव्य शेतकरी आंदोलन राष्ट्रीय किसान खेतमजदूर काँग्रेसच्यावतीने आयोजित करण्यात आल्याचे माहिती दिली.महाराष्ट्रातील पुर्व विदर्भात गेल्या आठवड्यात आलेल्या पावसामुळे शासकीय धान खरेदी केंद्रावर ज्या शेतकèयाचे धान उघड्यावर होते.ते पावसामुळे भिजले गेल्याने खराब झालेले आहेत ते सर्व धान सरकारने खरेदी करावे कारण सरकारच्या चुकीमूळे त्या धानाची मोजणी वेळेवर न झाल्याने पावसात भिजले गेल्याची टिका केली.राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारने केलेली कर्जमाफी ही फसवी ठरली असून आजही शेतकèयांना त्याचा लाभ मिळालेला नाही.याउलट काँग्रेसने तीन राज्यात सरसकट कर्जमाफी करुन शेतकèयांना दिला आहे.कर्जमाफी हे समाधान नसले तरी सबंधित शेतकèयाला अडचणीतून बाहेर काढणे हाच  उद्देश आहे.देशात शेतकरी सरकार विरोधात एकवटत असून २०१४ पर्यंत देशावर ५० लाख कोटीचे कर्ज होते ते मोदी सत्तेत आल्यानंतर साडे चार वर्षात १०० लाख कोटीच्यावर गेल्याचे म्हणाले.सरकारने २०१६ पासून शेतकरी आत्महत्यांची नोंद करणे बंद केल्याने खरा आकडा समोर आलेला नाही सोबतच २०१६ पासून बेरोजगार युवकांचीही नोंदणी बंद केल्याने देशात किती युवक बेरोजगार आहेत हा आकडा समोर न येण्यास सरकारच जबाबदार असल्याचे पटोले म्हणाले.