आता गरिबीवर सजिर्कल स्ट्राईक करू-राहुल गांधी

0
27

नागपूर,दि.05(विशेष प्रतिनिधी)ःः देशातील अत्यंत गरीब असलेल्या २0 टक्के असलेल्या ५ कोटी कुटुंबातील २५ कोटी नागरिकांच्या खात्यात वर्षाला ७२,000 रुपये जमा करण्याची योजना ज्येष्ठ अर्थतज्ज्ञांच्यासोबत सल्ला मसलतीनंतरच आखण्यात आली. देशाच्या अर्थव्यवस्थेला कोणताही धक्का लागू न देता ही रक्कम महिलांच्या खात्यात ७२ हजार रुपये जमा करू . म्हणजेच ५ वर्षात ३ लाख ६0 हजार देणारच. याशिवाय प्रत्येक तरुणाला किमान १२ हजार रुपये महिना वेतन मिळेल, असा रोजगार देऊ असे आश्‍वासन देत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी आता गरिबीवर सजिर्कल स्ट्राइक होईल, अशी घोषणा नागपुरात केली. दक्षिणेतील वायनाड मतदारसंघातून उमेदवारी दाखल केल्यानंतर ते थेट नागपुरात आले. कस्तुरंचद पार्क येथे महाआघाडीच्या वतीने आयोजित जाहीरसभेला त्यांनी बुधवारी सायंकाळी संबोधित केले.
यावेळी मंचावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, माजी खासदार गेव्ह आवारी, माजी खासदार मुकूल वासनिक, आमदार जोगेंद्र कवाडे, नागपूर लोकसभेचे उमेदवार नाना पटोले, रामटेकचे उमेदवार किशोर गजभिये, हर्षवर्धन पाटील, नितीन राऊत, अनिस अहमद, माजी मंत्री अनिल देशमुख, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष केशवचंद्र यादव, सत्यजित तांबे, प्रफु ल्ल गुडथे पाटील, रमेश बंग, विशाल मुत्तेमवार, अभिजित वंजारी, आमदार सुनील केदार, आशिष देशमुख यांची उपस्थिती होती.
यावेळी राहुल गांधी म्हणाले, मला आपल्यासोबत कायमचे नाते बनवायचे आहे. सोबत राहून काम करायची तयारी आहे. मोदींचे वय झाले आहे. म्हणून त्यांना घाई सुटलीय. माझ्याजवळ अजून भरपूर वेळ असल्याने घाई नाही. मला एक-दोन दिवसांसाठी राजकारण करायचे नाही. अर्जुनासारखे ठरले असून, त्यासाठी आकाश फ ाटले तरी मागे हटणार नाही, संकट आले तरी डगमगणार नाही, अशी ग्वाही दिली. मोदी शासनाच्या धोरणांवर टीका करताना म्हणाले, लोकसभा निवडणुकीनंतर राफेलसारख्या घोटाळ्यांची चौकशी होईल आणि चोर चौकीदार गजाआड असेल. घोटाळा कुणी केला हे पर्रिकर यांना माहीत होते, असा आरोप करीत अंबानी आणि अदानीच्या खिशातील पैसा आता गरिबांच्या खिशात जाईल आणि हेच गरिबी हटावसाठी होणारे सर्वांत मोठे सजिर्कल स्ट्राईक ठरेल, असेही ते म्हणाले.