राज्यात भाजपा 24, तर शिवसेना 20 जागांवर आघाडीवर,काँग्रेसमुक्त महाराष्ट्र

0
19

गोंदिया/मुंबई,दि.23ः- महाराष्ट्रात लोकसभेच्या निकालात बदल होईल असे वाटत असतानाच पुन्हा एकदा राज्यात 2014च्या लोकसभा निवडणुकीसारखा निकाल लागण्याची चिन्हे आहेत. राज्यातील अनेक मतदारसंघात शिवसेना-भाजपा उमेदवार आघाडीवर आहेत. आतापर्यंत बऱ्याच  ठिकाणी तीन फेऱ्यांचे कल हाती आले असून, कुठे आघाडीचा उमेदवार, कुठे युतीचे उमेदवार पुढे असल्याचे चित्र पाहायला मिळते आहे.या निवडणुकीच्या निकालात काँग्रेस मात्र भुईसपाट झाली असून महाराष्ट्रातून काँग्रेस लोकसभेच्या निकालात काँग्रेसमुक्त करण्यात भाजपला यश हाती आल्याचे दिसून येत आहे.
आतापर्यंतचे राज्यातील कल हाती आले.

महाराष्ट्रातल्या 48 जागांपैकी भाजपाला 24, तर शिवसेनेला 20 जागा मिळण्याचा कल हाती आला आहे. राष्ट्रवादी 3 आणि बहुजन विकास आघाडीला 1 जाग मिळणार आहे. त्यामुळे राज्यातील निवडणुकांचा निकाल लवकरच समजणार आहे. गेल्यावेळी म्हणजे 2014मध्ये भाजपाने 26 तर शिवसेनेने 22 जागा लढविल्या होत्या. त्यावेळी शिवसेनेनं 18 जागा, तर भाजपानं 23 जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे यंदा काय होते हे लवकरच समजणार आहे.  मात्र काँग्रेस महाराष्ट्रातून हद्दपार झाली असून दोन माजी मुख्यमंत्र्यासह आजी माजी प्रदेशाध्यक्षांनाही पराभव स्विकारण्याची वेळ आली आहे.विदर्भात मात्र भाजप सेना आघाडीला परत जनतेने संधी दिली असून वेगळा विदर्भ हा मुद्दाच आता गौण ठरला आहे.

जाहिररित्या मुकेश अंबानीनी मिलिंद देवरा यांना समर्थन देऊनही त्यांना विजय अवघड झाले आहे.क्षिण मुंबई मतदारसंघात शिवसेनेचे अरविंद सावंत यांनी आघाडी घेतली आहे. त्यांना 81,130 मतं मिळाली असून काँग्रेसच्या मिलिंद देवरा  यांच्या पारड्यात 53,743 मतं पडली आहेत.

बुलडाण्यामध्ये  सातव्या फेरीनंतर प्रतापराव जाधव यांनी आघाडी घेतली आहे. त्यांना ५८२१३ मतं मिळाली असून, राजेंद्र शिंगणे यांच्या पारड्यात ४०३५९  मते पडली आहेत.

यवतमाळ-वाशिम मतदारसंघात दहाव्या फेरी अखेर शिवसेनेच्या भावना गवळी यांनी 10258 मतांनी आघाडी घेतली आहे. गवळी यांना 54,310 तर माणिकराव ठाकरे यांना 44,052 मते पडली आहेत.

: भंडारा गोंदियाः-  सुनील मेंढे(भाजप)-104923 ,नाना पंचबुद्धे(राष्ट्रवादी)-74883 ,विजया नांदूरकर ( बसपा) – 7518 ,के. एन. नान्हे(वंचित बहुजन आघाडी)-4430

माढाः चौथ्या फेरीअखेर रणजित निंबाळकर-109213, संजय शिंदे- 105878, विजय मोरे- 10760
– लातूरः सुधाकर शृंगारे (भाजप)- 71818; मच्छिंद्र कामत (काँग्रेस)- 31252; राम गारकर (वंचित आघाडी)- 11765

– औरंगाबादः हर्षवर्धन जाधव- 53,855; इम्तियाज जलील- 50,656 तर खैरेंना 46,344 मते

– जालनाः दुसऱ्या फेरी अखेर रावसाहेब दानवे यांना 38 हजार मतांची आघाडी

– बारामतीत लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून, बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांनी ताज्या  माहितीनुसार २९, ९१३ मतांनी आघाडी घेतली आहे. त्यांना१,९६,४३० मतं मिळाली असून कांचन कुल यांच्या पारड्यात १,६६,५१७ मतं पडली आहेत.

– मावळः पार्थ पवार- 145140, श्रीरंग बारणे- 202363, बारणे आघाडी – 60223

– शिरूरः अमोल कोल्हे- 1,15,881; आढळराव पाटील- 98751
– पुणेः गिरीश बापट- 30,682, मोहन जोशी- 14,456; बापट 16,226 मतांनी पुढे

– अमरावतीमध्ये तिसऱ्या फेरीनंतर आनंदराव अडसूड यांना 67340 आणि नवनीत कौर राणा यांना 63109 मते, गुणवंत देवपारेंना फक्त 9341 मते

– चंद्रपूर: भाजपचे हंसराज अहिर यांना 16225 मते, तर बाळू धानोरकर यांना 16176 मते
– रावेरमध्ये पहिल्या फेरीत रक्षा खडसे यांची 14 हजार मतांनी आघाडी