खा.पटेलांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसची सभा ३० जून रोजी 

0
15
 गोंदिया,दि.25 : खासदार प्रफुल्ल पटेल हे ३० जून रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. दरम्यान दुपारी १ वाजता गोंदिया-भंडारा या दोन्ही जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा करण्यात येणार आहे. बैठकीत नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीचा आढावा तसेच आगामी विधानसभा निवडणूकसंदर्भात चर्चा करण्यात येणार आहे. भंडारा-गोंदिया या दोन्ही जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येत बैठकीत उपस्थित रहावे, असे आवाहन दोन्ही जिल्ह्यातील जिल्हाध्यक्षांनी केले आहे..