आत्मसर्मपित नक्षल्यांना धनादेश वितरण

0
11

गोंदिया ,दि.25ः-देशात नक्षल चळवळीला प्रतिबंध घालता यावा व अधिकाधिक नक्षल्यांनी आत्मसर्मपण करून विकासाच्या मुख्य प्रवाहात यावे त्यांचे सामाजिक व आर्थिक पुनर्वसन व्हाव या उद्देशाने महाराष्ट्र शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या आत्मसर्मपित योजनेतंर्गत पोलिसांसमोर आत्मसर्मपण करणार्‍या दोन माओवाद्यांना जिल्हा पोलीस अधीक्षक विनीता साहू यांच्या हस्ते २४ जून रोजी धनादेश वितरण करण्यात आले. तर मागील वर्षी चिचगड परिसरात घडलेल्या चकमकीत जखमी झालेल्या पोलिसांनाही धानदेश देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
मागील वर्षी २0 सप्टेंबर रोजी चिचगड अंतर्गत कोसबी जंगल परिसरात पोलीस पथकावर माओवाद्यांनी सशस्त्र हल्ला केला होता. ज्यामध्ये पोहवा शेखर सोनवाने, नापोशी रामेश्‍वर राऊत, नंदकिशोर पटले अंजनराव सोडगिर हे पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. दरम्यान, जखमी झालेल्या पोलिसांना शासनाच्या योजनेनुसार शेखर सोनवाने यांना २ लाख ३0 हजार रुपये, रामेश्‍वर राऊत २ लाख रुपये, तर नंदकिशोर पटले व अंजनराव सोडगिर यांना प्रत्येकी २ लाख रुपयाचे धनादेश जिल्हा पोलीस अधीक्षक विलीता साहू यांच्या हस्ते देण्यात आले. त्याच बरोबर आत्मसर्मपित योजनेतंर्गत आत्मसर्मपन करणाड्ढया १४ सप्टेंबर २0१८ रोजी गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील लवारी येथील रजूला उर्फ अनिता रवेलसिंग हिडामी हिने गोंदिया जिल्हा पोलिसांसमक्ष आल्मसर्मपण केले होते. तर गडचिरोली जिल्ह्यातीलच कोरची तालुक्यातील बोडेना येथील जगदिश उर्फ महेश उर्फ विजय अगणू गावडे याने २७ मे रोजी जिल्हा पोलिसांसमोर आत्मसर्मपण केले होते. दरम्यान, आत्मसर्मपित योजनेतंर्गत जगदिश गावडे यास २ लाख ५0 हजार व रजूला हिडामी हिला २ लाख रुपयाचे धनादेश देण्यात आले. यावेळी मानवी संशोधन शाखेचे पोलीस निरीक्षक सुधीर घोनमोडे, नक्षल सेल गोंदियाचे पोलीस उपनिरीक्षक महेंद्र शहारे व मुकेश कुरेवाड यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.