अर्जुनी मोरगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा- राष्ट्रवादी काँग्रेस

0
18
अर्जुनी मोरगाव,दि.26 –  गोंदिया जिल्ह्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती आहे. शासनाने या परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन उपाययोजना करणे आवश्यक आहे. शेतकर्‍यांना दिलासा देणारे कुठलेही प्रयत्न शासन यंत्रणेमार्फत अजून तरी सुरु झालेले नाहीत. यावर उपाय म्हणून लगेचच तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून उपाययोजना कार्यान्वित कराव्यात, अशा मागणीचे निवेदन तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तहसीलदार अर्जुनी मोरगाव यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना दिले आहे.
पत्रात म्हटले आहे की, अर्जुनी मोरगाव तालुक्यात अभूतपूर्व दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. आजच हजारो एकर क्षेत्रावरील झालेली पेरणी पार नष्ट  झाली असून दुबार पेरणीची वेळ आली आहे.त्यामुळे तालुक्यातील शेतकर्‍यांची अवस्था अतिशय दयनीय झालेली आहे.
 उन्हाळी धानपिकाला ५०० रुपये बोनस द्यावा,सरसकट कर्जमाफ करावे,शेतीसाठी कृषिपंपाचे विद्युत बिल माफ करा,म ग्रा रो ह योजनेची कामे सुरू करा, कृषिपंपाचे नवीन कनेक्शन त्वरीत द्या,युवकांसाठी गाव तिथे व्यायामशाळा राबवा, ग्रा पं च्या कुशल कामाचा निधी तातडीने उपलब्ध करून द्यावा, गॅस डिझेल व पेट्रोलचे दर कमी करा, स्वामिनाथन आयोगाचे शिफारसी लागू करा,विजेचे घरगुती वीज शुल्क माफ करा, मच्छीमार तलावांचे लीज माफ करा, झाशीनगर उपसा सिंचन प्रकल्पातील गावांना सिंचनासाठी त्वरित पाणीपुरवठा सुरू करा,प्रलंबित वनहक्क कायद्याअंतर्गत जमिनीचे पट्टे त्वरित निकाली काढा,वाढलेले रासायनिक खताचे दर कमी करा, सोलर कृषी पंपाचे कनेक्शन त्वरित द्या या मागण्यांचा समावेश आहे
तातडीने काही उपाययोजना केल्या नाहीत तर विदारक परिस्थिती निर्माण होईल. सततच्या दुष्काळामुळे शेतकर्‍यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे.राज्यातील अल्पभूधारक शेतकरी, आदिवासी दलित शेतकरी याचा गांभिर्याने विचार करावा असे पत्रात म्हटले आहे.
निवेदन देताना जि.प.सदस्य किशोर तरोणे,अविनाश काशिवार, तालुका अध्यक्ष लोकपाल गहाणे,तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षा सुशिला हलमारे,दीपक सोनवणे आदी पदाधिकाऱ्यांसह  शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.