*द रोल मॉडल ऑफ गुड डीड्स* पुरस्काराने आमदार राजकुमार बड़ोले सम्मानीत

0
8

थाईलैंड येथील बुद्धिस्ट विद्यापीठाने केला गौरव
गोंदिया,दि.30ः- थाईलैंड येथील महचुला बुद्धिस्ट विद्यापीठाच्यावतीने महाराष्ट्राचे माजी सामाजिक न्यायमंत्री व  आमदार राजकुमार बड़ोले यांचा *द रोल मॉडल ऑफ गुड डीड्स* हा पुरस्कार देऊन गौरव केला आहे.बँकाक येथे त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.
आपल्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात बड़ोले यांनी दलित, शोषित, पीड़ित आणि इतर समाजाच्या कल्याणासाठी भरीव कार्य केले. भारतरत्न परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा सच्चा अनुयायी या नात्याने महाराष्ट्रात त्यांनी बुद्ध धम्माच्या प्रचार व प्रसारासाठी घेतलेल्या भूमिकेबद्दल त्यांचा हा सत्कार करण्यात आला आहे.त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.