जिल्ह्यातील ६२ गावांमध्ये पोषण इंडिया मोहिम

0
18
१ ते ३० सप्टेबर पर्यंत राबविण्यात येणार मोहिम
गडचिरोली ,दि.30: महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन प्रतिष्ठान, रॅकेट बेंकैझर, पॅन इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने पोषण इंडिया कार्यक्रम राबविण्यात येत आहे. तर राज्यातील  १००० गावांमध्ये ही  मोहीम आयोजित करण्यात येत आहे.  सदर मोहिम  अभियानात समाविष्ट असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील ६२ गावांमध्ये  राबविण्यात येणार असून  ही मोहिम १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर पर्यंत प्रत्येक ग्रामस्तरावर राबविण्यात येणार आहे.
माता आणि बालकांच्या आरोग्य पोषण स्थितीमध्ये सुधारणा करणे हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्धेश  आहे.  मातेचे  पोषण आणि आहारा बद्दल सक्षमीकरण करून, त्यांना  स्तनपानाचे महत्व पटवून देण्यात येणार आहे. पोषण माह मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी, व्हीएसटीएफचे  मुख्यमंत्री ग्राम परिवर्तक  प्रेरकाची भूमिका बजावत आहेत. अंगणवाडी सेविका तसेच ए.एन.एम या मोहिमेत मुख्य सहभाग घेऊन सदर कार्यक्रम  अंगणवाडी स्तरावर प्रभावीपणे राबविणार आहेत. पोषण माह आंदोलनात, प्रत्येक दिवशी एक कार्य करण्याचे प्रायोजित केलेले आहे. सदर कार्यक्रम, अंगणवाडी स्तरावर अंगणवाडी सेविकेच्या आणि ए. एन.एम. च्या माध्यमातून पार पडणार आहे. पोषण मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी,  ग्रामपरिवर्तकांनी अंगणवाडीला भेट देऊन अंगणवाडी सेविकेसमवेत समन्वय साधून या  कार्यक्रमाचे नियोजन केलेले आहे.