नांदेडच्या महापौरपदी कॉंग्रेसच्या शैलजा स्वामी

0
15

नांदेड- नांदेड महापालिकेसाठी मंगळवारी (ता. 28) झालेल्या निवडणुकीत कॉंग्रेसच्या शैलजा किशोर स्वामी यांची महापौरपदी व कॉंग्रेसचेच शफी अहेमद कुरेशी यांची उपमहापौरपदी निवड झाली.

मंगळवारी सकाळी अकरा वाजता पीठासीन अधिकारी जिल्हाधिकारी धीरजकुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष सभेत निवडणूक प्रक्रियेला सुरूवात झाली होती. शैलजा स्वामी यांना 51 तर शिवसेनेच्या जयश्री जाधव यांना 17 मते पडली. शैलजा स्वामी यांची महापौरपदी निवड झाल्याचे पीठासीन अधिकारी यांनी जाहीर केले. एआयएमआयएमचे 11 तर संविधान पक्षाचे दोन असे 13 सदस्य गैरहजर राहिले. त्यामुळे उर्वरित 68 सदस्यांनी मतदानात सहभाग नोंदविला.