सरकारने घेतलेले निर्णय जनतेपर्यत पोहचवा – मुख्यमंत्री

0
11

मुंबई दि. १-संघटना विक्रमी सदस्यसंख्या करून भाजपाच्या कार्यकर्त्यांनी पहिली फेरी जिंकली असली तरी अद्यापी पल्ला बाकी आहे. महासंपर्क अभियानाच्या माध्यमातून संघटना बळकट करूया आणि सरकार व समाज यांच्यातील समन्वय बनू असे आवाहन भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खा रावसाहेब दानवे यांनी केले तर केंद्र आणि राज्‍य सरकारने निर्णय क्षमता दाखवून जनेतच्‍या हिताचे अनेक महत्‍वाचे निर्णय घेतले आहेत. दोन्‍ही सरकारने घेतलेले हे निर्णय जनतेपर्यंत पोहचविण्‍याचे पक्ष कार्यकर्ता हे एक प्रभावी माध्‍यम आहे. महासंपर्क अभियानाच्‍या निमित्‍ताने पक्षाच्‍या कार्यकर्त्‍यांनी सरकारचे हे निर्णय जनतेपर्यंत पोहचवावे, असे आवाहन राज्‍याचे मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी आज येथे केले.

भाजपाचे देशभर महासंपर्क अभियान आजपासून सुरू होते झाले. पक्षाचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष अमितभाई शहा यांनी पंतप्रधान नरेद्र मोदी यांना भेटून या अभियानाची सुरूवात दिल्‍ली येथे केली. तर प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी भोकरदन तालुक्यांतील शिपोरा या ग्रामीण भागातील एका लहान खेड्यात सुरूवात केली, तर राज्‍यात मुंबई भाजपाचे अध्‍यक्ष आमदार अॅड आशिष शेलार आणि महासंपर्क अभियानाचे राज्‍याचे प्रमुख आमदार सुभाष देशमुख आज मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणविस यांची सहयाद्री अतिथीगृहावर भेट घेतली व अभियानाची सुरूवात केली. यावेळेस त्यांच्यासोबत राज्‍यमंत्री विद्या ठाकूर, आमदार राज पुरोहित, योगेश सागर, भाजपा नेत्‍या शायना एन.सी., प्रवक्‍ते केशव उपाध्‍ये यांच्‍यासह भाजपाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्‍यांनी उपस्थित होते.

ग्रामीण कार्यकर्त्यांशी संवाद साधताना दानवे यांनी संघटनाबळकटीचा निर्धार करण्याचा संकल्प करा असे सांगितले. संघटना सक्षम असेल तर कोणतीही निवडणूक जिंकता येते आज केंद्रात मोदी आणि राज्यांत फडणवीस यांच्या रूपाने सक्षम नेतृत्व आपल्याकडे आहे, समाज आपल्या बरोबर आहे आता या निमित्ताने संघटन आणखी मजबूत करूया असे ते म्हणाले.

तर मुंबईत उपस्थित भाजपाच्‍या सर्व पदाधिकाऱयांचे मनापासून स्‍वागत करीत मुख्‍यमंत्री देवेद्र फडणविस यांनी भाजपाने दहा कोटी सभासद नोंदणी करून जगातील सर्वात कोठा पक्ष होण्‍याचा बहूमान मिळविला याचा आनंद होतो आहे. राज्‍यात एक कोटी तर मुंबईत पंचविस लाख सभासद झाले आहेत. या सर्वांच्‍या घराघरात जाऊन त्‍यांना संपर्क करा त्‍यासोबतच सरकारचे चांगले निर्णय जनतेपर्यंत पोहचवा, असे आवाहन मुख्‍यमंत्र्यांनी कार्यकर्त्‍यांना केले.

यावेळी बोलताना मुंबई भाजपाचे अध्‍यक्ष आमदार अॅड आशिष शेलार म्‍हणाले की, आजपासून देशभर भाजपाचे हे संपर्क अभियान सुरू होत असून ज्‍यांनी सदस्य नोंदणी मोहिमेत भाग घेतला अशा राज्‍यातील एक कोटी जनतेपर्यंत पोहचून भाजपाचे कार्यकर्ते दोन्‍ही सरकारने घेतलेल्‍या निर्णयाची माहितीपत्र देऊन त्‍यांना भाजपाचे कार्यकर्ते होण्‍याचे आवाहन करणार आहेत. पक्षाचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष अमितभाई शहा यांचा हा संदेश घेवून आम्‍ही आपल्‍याकडे आलो आहेता असे सांगत आमदार आशिष शेलार यांनी मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणविस यांना महासंपर्क अभियानाचे माहितीपत्र दिले ते स्विकारून मुख्‍यमंत्र्यांनी पक्षाच्‍या महासंपर्क अभियानाची औपचारीक सुरूवात केली.

उपस्थित भाजपाच्‍या सर्व पदाधिकाऱयांचे मनापासून स्‍वागत करीत मुख्‍यमंत्री देवेद्र फडणविस यांनी भाजपाने दहा कोटी सभासद नोंदणी करून जगातील सर्वात कोठा पक्ष होण्‍याचा बहूमान मिळविला याचा आनंद होतो आहे. राज्‍यात एक कोटी तर मुंबईत पंचविस लाख सभासद झाले आहेत. या सर्वांच्‍या घराघरात जाऊन त्‍यांना संपर्क करा त्‍यासोबतच सरकारचे चांगले निर्णय जनतेपर्यंत पोहचवा, असे आवाहनही मुख्‍यमंत्र्यांनी कार्यकर्त्‍यांना केले.