24.3 C
Gondiā
Thursday, August 13, 2026
Home राजकीय प्रवीण दरेकर यांची विधान परिषदेच्या विरोधीपक्षनेतेपदी निवड

प्रवीण दरेकर यांची विधान परिषदेच्या विरोधीपक्षनेतेपदी निवड

0
28

नागपूर,दि.16- भाजपकडून विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाची माळ कोणाच्या गळ्यात घालणार याकडे सर्वांचं लक्ष होते. सर्वात आधी या शर्यतीत माजी मंत्री पंकजा मुंडे यांचे नाव चर्चेत होते. पण, विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी भाजपच्या प्रवीण दरेकर यांची वर्णी लागलेली आहे. या यादीत भाजपचे प्रदेश महामंत्री सुजितसिंह ठाकूर यांच्याही नावाची जोरदार चर्चा होती. दरम्यान, भाजपचे मुख्य प्रतोद म्हणून सुजितसिंह ठाकूर यांची निवड झाली, तर भाई गिरकर यांची उपनेतेपदी निवड झाली.

चंद्रकांत पाटलांच्या रूपाने भाजपचे प्रदेशाध्यक्षपद पश्चिम महाराष्ट्राकडे तर, विधानसभा विरोधी पक्षनेतेपद फडणवीस यांच्या रुपाने विदर्भाकडे आहे. यात आता विधानपरिषदेचे विरोधीनेतेपद मुंबईकडे गेले आहे. माजी मंत्री डॉ. रणजित पाटील, सुजितसिंह ठाकूर, प्रसाद लाड, भाई गिरकर यांच्या नावाचीही या पदासाठी चर्चा होती. मात्र, आक्रमक व नवा चेहरा म्हणून दरेकर यांच्या नावाला पक्षात पसंती मिळाल्याचे कळते.

blank