पेट्रोल,डिझेल दरवाढीच्या विरोधात राँकाचे आंदोलन

0
10

मुंबई, दि. 16 :पेट्रोल आणि डिझेल दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते सचिन अहिर यांच्या नेतृत्वाखाली मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी वरळी नाका येथे निदर्शने केली. अच्छे दिन आयेंगे असे म्हणत सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदी यांच्या सरकारने सर्वसामान्य जनतेचा भ्रमनिरास केला आहे. पेट्रोल-डिझेल दरवाढ, बेस्ट दरवाढ आणि त्याचबरोबर वाढत्या महागाईने गरीबांचे कंबरडेच मोडले आहे. महागाई कमी झाली, असा डंका पिटणारे आशीष शेलार आता आहेत कुठे, असा खडा सवाल सचिन आहिर यांनी या वेळी केला. केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात येत्या सोमवारपासून मुंबईच्या प्रत्येक वॉर्ड आणि तालुक्याच्या ठिकाणी आंदोलन करण्याचा इशाराही अहिर यांनी दिला.