राष्ट्रवादीच्या आजी माजी सभापतीचा भाजप प्रवेश

0
9

तिरोडा,दि.13-गोंदिया जिल्हा परिषदेच्या निवडणुकांना जस जसा रंग चढू लागला तस तसे राजकीय क्षेत्रातील नेत्यामधील मतभेद सुध्दा उघड होऊ लागले आहेत.तिरोडा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे प्राबळ्य असल्याने अनेकांनी जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी मागितली होती.त्यापैकी माजी सभापती रजनी सोयाम यांची उमेदवारी पक्की मानली जात होती.परंतु एैनवेळेवर राष्ट्रवादीच्या माजी आमदारानी उमेदवारी नाकारल्याने श्रीमती सोयाम यांनी विद्यमान उपसभापती तुण्डीलाल शरणागत , राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष छबिलाल पटले,थानसिंघ बघेले माजी पं.स उपसभापति,मिलिंद कुंभरे “सरपंच” बेर्डिपार खुर्सीपार,गौरीभाऊ टेंभरे माजी “सरपंच” मेंढा,लालचंद उइके माजी “उपसरपंच” बेर्डिपार,युवराज टेंभरे “उपसरपंच” बेरड़ीपर खुर्सीपार,रमेश साठवने ग्रामपंचायत सदस्य बेरड़ीपार खुर्सीपार यांचा समावेश आहे.त्यांनी आमदार विजय रहागंडाले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भाजपमध्ये प्रवेश केला.यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मदन पटले,तालुकाध्यक्ष चुतर्भूज बिसेन,नितेश पंजवानी,उमा हारोडे आदी भाजपचे नेते उपस्थित होते.