अच्छे दिन हवेत, 25 वर्षे वाट बघा – अमित शहा

0
8

अमित शहांच्या विधानावर भाजप गांगरली
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभांतील अच्छे दिन येण्यासाठी केवळ पाच वर्षे नाही तर पाच वेळा दिल्ली पासून गल्लीपर्यंत सत्ता द्यावी लागेल. पंचेवीस वर्षे भाजपला सत्ता मिळाल्याशिवाय अच्छे दिन शक्य नाहीत, असे विधान भाजप पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी काल मध्य प्रदेश येथे केले. शहा यांच्या विधानाने गांगरलेल्या भाजपने आता त्यांच्या विधानाचा विपर्यास केल्याची ओरड सुरू केली आहे.दरम्यान, शहा यांच्या त्या भाषणाची ध्वनिचित्रफीत बाहेर आल्याने त्यांच्या खुलाशाची हवा निघाली आहे.
महासदस्य मोहिमेतील या भाषणात शहा यांनी “अच्छे दिन‘ असा उल्लेखच केला नसल्याचे भाजप नेते पीयूष गोयल यांनी म्हटले आहे. विकास म्हणजेच “अच्छे दिन‘ असा मोदींच्या प्रचारसभेतील भाषणांचा अर्थ होता, असे आता भाजपकडून सांगितले जात आहे. त्यामुळे शहा यांनी मोदींच्या आणखी एका आश्‍वासनाचा फुगा फोडल्याचे समोर आले आहे. या विधानाचा खुलासा करताना गोयल यांनी जबाबदारपणे वृत्तांकन करण्याचा सल्ला देऊन पत्रकारांनाच बेजबाबदार ठरविले.

राजकीय अज्ञान
भाजप अध्यक्ष अमित शहा यांचे राजकीय अज्ञान कालच्या भाषणातून प्रकट झाले. ते म्हणाले, की भारताला विश्‍वगुरूच्या स्थानी विराजमान करण्याचे स्वप्न तेव्हाच साकार होईल, जेव्हा स्वातंत्र्यानंतर कॉंग्रेसला 1950 ते 1967 पर्यंत मिळाली तशी पंचायतीपासून संसदेपर्यंत पूर्ण शासनव्यवस्था भाजपच्या ताब्यात येईल. कॉंग्रेसला 1950 ते 1967 नव्हे; तर 1947 ते 1967 अशी 25 नव्हे तर 20 वर्षेच सलग सत्ता मिळाली होती. पहिली सार्वत्रिक निवडणूक 1952 मध्ये झाली, हे लक्षात घेतले तर हा काळ आणखी कमी होतो.