भाजप काँग्रेसमध्ये युत्ती!भाजपच्या अध्यक्षपदी रचना गहाणे,काँग्रेसचे उपाध्यक्ष पी.जी.कटरे

0
16

गोंदिया,दि.१४-जिल्हा परिषद गोंदियाच्या निवडणुकीच्या निकालाची घोषणा ६ जुर्लेला झाली.यात राष्ट्रवादी काँग्रेस २० जागा घेऊन पहिल्या क्रमांकावर तर १७ जागा घेऊन भाजप दुसèया क्रमांकावर आहे.काँग्रेस १६ जागा घेत तिसèया क्रमांकावर आहे.आधीपासूनच अध्यक्षपद qकवा विधानपरिषदेची जागा राष्ट्रवादीकडे मागणाèया काँग्रेसची भाजपशी युती पक्की झाल्याची माहिती सुत्रांनी दिली.त्यानुसार काँग्रेस येत्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत प्रफुल अग्रवाल qकवा सेवक वाघाये यापैकी कुणालाही रिंगणात उतरवेल त्यावेळी भाजपचे सर्व सदस्य काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान करतील.त्यामोबदल्यात गोंदियात भाजपला अध्यक्षपद देऊन उपाध्यक्षपद काँग्रेस स्वतःकडे ठेवणार आहे.भंडारा येथे अध्यक्षपद काँग्रेसकडे व उपाध्यक्षपद भाजपला तसेच शिवसेना व अपक्ष यांना सभापतीपद असे समीकरण ठरल्याची मंग़ळवारच्या रात्री १० नंतरची चर्चा समोर आल्याने नव्या समीकरणाला सुरवात झाली आहे.प्रफुल पटेलांच्या राष्ट्रवादीला कुठल्याही परिस्थितीत सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी भाजपने वरच्यापातळीवरुन काँग्रेसला मदतीचे आश्वासन दिले आहे.गोंदियाच्या या राजकारणात मोठे अर्थकारण सुध्दा लपले असल्याचे वृत्त आहे.नागपूरचे वरिष्ट भाजप नेते दत्ता मेघे यांच्यासारखेच आपल्या मुलांचे सुध्दा राजकीय पुनवर्सन व्हावे या हेतूनच आमदार अग्रवालांनी राष्ट्रवादीला सोडून भाजपशी युती करण्याचा बेत आखल्याचे बोलले जात आहे.या सर्व राजकारणात गोंदिया नगरपालिका क्षेत्रात तयार होणाèया भूमिगत गटार योजनेचे सुध्दा राजकारण असल्याचे बोलले जात असले तरी बुधवारला उमेदवारी मागे घेईपर्यंत काहीही होऊ शकते.