३४ वी राज्यस्तरीय योगासन स्पर्धा २ पासून

0
13

आमगाव,दि.२९-बृहन महाराष्ट्र योग परिवार अमरावतीच्या मार्गदर्शनाखाली गोंदिया जिल्हा योग असोसिएशनद्वारे ३४ व्या राज्यस्तरीय योगासन स्पर्धांचे २ ते ४ ऑक्टोबरपर्यंत श्री लक्ष्मणराव मानकर गुरुजी शैक्षणिक संकुल व विजयालक्ष्मी सभागृह रिसामा येथे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे उद्घाटन सामाजिक न्यायमंत्री इंजि.राजकुमार बडोले यांच्या हस्ते आमदार संजय पुराम यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार विजय रहांगडाले, जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक गिरी तर स्वागताध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. दिलीप संघी उपस्थित राहणार आहेत. राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत नऊ विभागातील ८०० स्पर्धक व १०० पंच अधिकारी उपस्थित राहणार आहेत.तीन दिवस चालणाèया स्पर्धेत राज्यातील नामवंत योग प्रशिक्षक, खेळाडू येणार असल्यामुळे आकर्षक योगासनाचे प्रात्यक्षिक बघण्याची संधी मिळणार आहे. बृहन महाराष्ट्र योग परिषदेचे सरकार्यवाह डॉ. अरुण खोडस्कर, स्पर्धा प्रमुख सतीश मोहगावकर, डॉ. क्षीरसागर ,राज्य कार्यकारिणी उपाध्यक्ष विनायक अंजनकर, जिल्हा अध्यक्ष सुरेश कोसरकर, कार्याध्यक्ष चित्रा धोमणे, उपाध्यक्ष लालचंद पारधी, सचिव शशांक कोसरकर, माधुरी परमार, दालचंद मेश्राम, झनकू बघेले, प्रा. रंजीतकुमार डे, रवी आचार्य, प्रा. किशोर निखारे यांनी स्पर्धेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.