अनुदानित आश्रमशाळेच्या शिक्षकाच्या उपोषणाची सांगता

0
13

देवरी,दि.२९-अनुदानित आश्रमशाळा शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना गोंदिया व भंडारा जिल्ह्याच्यावतीने आदिवासी आश्रमशाळेतील कर्मचारी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांना घेऊन एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयासमोर ५ सप्टेंबर पासून साखळी उपोषण आंदोलनाला सुरवात केली होती.१८ सप्टेंबर पासून सदर उपोषणाचे रूपांतर आमरण उपोषणात केल्यानंतर आंदोलनाची शासनस्तरावर दखल घेण्यात आल्याने आज 20 व्या दिवशी आंदोलनाची सांगता करण्यात आली.आमदार संजय पुराम, ठाणेदार राजेंद्र तिवारी, लिलेश्वर बोरकर, प्रमोद संगीडवार, आनंदराव कळपते व श्रीकृष्ण हुकरे यांच्या हस्ते उपोषनकत्र्यांना qनबूपाणी पाजून उपोषणाची सांगता करण्यात आली.
मागील २० दिवसापासून देवरीच्या एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयासमोर गोंदिया जिल्ह्यातील ७ आदिवासी आश्रमशाळेतील १३ कर्मचारी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांना घेऊन आमरण उपोषणावर बसले होते. या उपोषणाचे गांभीर्य लक्षात घेऊन खासदार नाना पटोले आणि शिक्षक आमदार ना.गो. गाणार,आमदार संजय पुराम यांनी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा, अप्पर आयुक्त आदिवासी विकास विभाग आणि प्रकल्प अधिकारी देवरी यांच्याशी चर्चा करुन सदर मागण्यांना मार्गी लावण्याकरिता प्रयत्न केले. या मागण्यांमध्ये माहे जून २०१२ पासून नियंत्रीत वेतन अदा करणे, पहारेकरी पदाला मानधन अदा करणे अशा यांच्यासह ११ मागण्यांचा यात समावेश आहे. मागण्याबाबद आदिवासी विकास विभागाकडून दखल घेण्यात आली असून सकारात्मक कारवाई करण्यात येईल असे आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी संघटनेचे पदाधिकारी अध्यक्ष एस.आर. शर्मा, उपाध्यक्ष बी.एस. फुंडे, सचिव विलास सपाटे, सदस्य रविशंकर qझगरे, पीे.आर. भांडारकर आणि जी.पी. खुणे यांच्याशी चर्चा करुन सांगितले. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी ही संघटनेच्या पदाधिकाèयांनी भेट घेऊन चर्चा केली.