मोहालीत भारताची दिवाळी

0
7

मोहाली- पहिल्या दिवसापासून फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीमुळे मोहालीमधील पहिली क्रिकेट कसोटीचा तिसऱ्याच दिवशी निकाल लागला. फिरकीचे वर्चस्व राहिलेल्या या कसोटीमध्ये भारताने 108 धावांनी विजय मिळविला. भारतीय संघाचा दुसरा डाव 200 धावांत आटोपल्यानंतर भारताच्या फिरकी गोलंदाजांसमोर दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी सपशेल नांगी टाकली. दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव 109 धावांमध्येच आटोपला. भारताकडून रवींद्र जडेजाने पाच बळी मिळविले. 

या सामन्यातील पहिल्या दोन्ही दिवशी फिरकी गोलंदाजांचे वर्चस्व राहिले होते. तिसऱ्या दिवशीही हीच परिस्थिती कायम राहिली. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला, तेव्हा भारताने दोन गडी गमावून 125 धावा केल्या होत्या. मात्र सकाळच्या सत्रामध्ये भारताने 85 धावांमध्ये उर्वरित आठ गडी गमावले. पहिल्या डावात भारताने 201 धावा केल्या होत्या, तर दुसरा डाव 200 धावांमध्ये संपुष्टात आला. पहिल्या डावातील 17 धावांच्या आघाडीमुळे दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 218 धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले.