प्रो. कबड्डीत आकाश पिकलमुंडे यांची गरुडझेप इतरांना प्रेरणादायी : संजय मते

0
33
भंडारा : महाराष्ट्र राज्यातल्या अगदी शेवटच्या टोकावर  असलेल्या भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुका येथील पालडोंगरी या छोट्याशा गावातून आकाश पिकलमुंडे यांनी प्रो. कबड्डी स्पर्धेत गरुडझेप घेतली. आकाशची गरुडझेप ही इतरांनाही प्रेरणा देणारी आहे, असे मत ओबीसी क्रांती मोर्चाचे संजय मते यांनी केले.
ते आकाशच्या सत्काराप्रसंगी बोलत होते. शासकीय विश्रामगृह येथे आकाश पिकलमुंडे यांचे सत्कार कार्यक्रम आयोजित केले होते. याप्रसंगी आकाशचे पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले.
मते पुढे म्हणाले, आकाश पिकलमुंडे यांनी बालपणापासून मातीत कबड्डी खेळत खेळत त्याने प्रो. कबड्डीत गरुडझेप घेतली. त्याच्या यशाने भंडारा जिल्ह्याची मान अभिमानाने उंचावली. जिल्ह्यातील खेडाळूंचा आकाश पिकलमुंडे यांच्यामुळे आत्मविश्वास वाढला. शालेय खेळात आकाश पिकलमुंडे याने मातीच्या मैदानात विशेष छाप पाडली. शालेय खेळानंतर आकाश विद्युत महामंडळाकडून खेळायचा या खेळात आकाश पिकलमुंडे विदर्भ एक्सप्रेस म्हणून ओळखला जावू लागला. अशोसिएशनद्वारे खेळल्या जाणाऱ्या अनेक कबड्डी स्पर्धेत सहभाग घेतला. २०१० ते २०११ नंतर शालेय खेळात आकाशने एक वेळा राष्ट्रीय स्तरावर पाच वेळा राष्ट्रीय स्तरावर आपली किर्ती गाजवली. नागपूर विद्यापीठातून पाच वेळा वेस्टन झोन मारुन कलर कोट तर दोन वेळा औरंगाबाद विद्यापिठातून आॅल इंडिया वेस्टर्न झोन गाठून कबड्डी खेळात नाव गाजवले.
२०१२ व २०१५/१६ एकदा वेळा शिनिअर नॅशनलपर्यंत आपला डंका वाजवला. २०२१ च्या प्रो. कबड्डीच्या हंगामात प्रथमतः आकाशला एंट्री मिळाली. बंगाल वारियर्सने आकाशला १७ लाख रुपये देऊन खेळायची संधी उपलब्ध करून दिली आहे. आकाशच्या निवडीची बातमी येताच भंडारा जिल्ह्यातील कबड्डी व खेळप्रेमींना उत्साह झाला. आकाश आता बंगाल वारियर्सचे प्रतिनिधीत्व करणार आहे.
यावेळी बाबा पाटेकर, जीवन भजनकर, संजय मते, संदीप मारबते, उमेश मोहतूरे, अमर भुरे, चेतन चेटुले, नेहाल भुरे, सुरेश शेंडे, संजय बांते, अजीज शेख, नितीन नागदेवे, सुरेश कढव, ईश्वर माटे, प्रवीण भोंदे, दिवाकर मने, संजय वाघमारे, श्री. शिंगनजुडे, गणेश गायधने, भारत मते उपस्थित होते.