डवकीची भाग्यश्री बनली राष्ट्रीय खेळाडू

0
11

देवरी-  तालुक्यातील डवकीच्या सिद्धार्थ हायस्कूल संलग्न कला विज्ञान  कनिष्ठ महाविद्यालयातील वर्ग 12 वीची विद्यार्थी भाग्यश्री मधुकर  बावणे हिने जालना येथे आय़ोजित  19 वर्षाखालील तायक्वाॅंडो स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला.

भाग्यश्री हिने जालना येथे आय़ोजित राज्यस्तरीय तायक्वॉंडो स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविल्याबद्दल प्रा. महेंद्र मेश्राम यांनी तिचे अभिनंदन केले. भाग्यश्री हिची निवड आता पंजाब येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेकरीता झाली आहे. ती राष्ट्रीय स्तरावर पोचणारी विद्यालयातील प्रथम विद्यार्थीनी आहे. तिच्या यशाबद्दल जागेश्वर ठवरे, व्ही टी पटले, योगेश बोरकर, एच. टी. खोब्रागडे, लांजेवार, कुलसुंगे,कोकावार, टेेंभरे, बिसेन, वालदे,  चव्हाण, जवंजार मेश्राम आदींनी भाग्यश्रीचे अभिनंदन केले. तिने आपल्या यशाचे श्रेय आपले आईवडील, विद्यालयाचे प्राचार्य आणि सर्व शिक्षकांना दिले.