धोनीचा स्टंपिंग मध्ये जागतिक विक्रम

0
12

ऑस्ट्रेलियात टी ट्वेंटी सामन्यांची मालिका खिशात टाकतानाच टीम इंडियाचा कप्तान महेंद्रसिग धोनी याने त्याच्या कारकिर्दीतला आणखी एका जागतिक विक्रमाची नोंद केली आहे. धोनीने आंतरराष्ट्रीय सामन्यात (कसोटी, वन डे व टी ट्वेंटी) विकेटकिपर म्हणून स्टंपिंगचे नवे रेकॉर्ड नोंदविताना श्रीलंकेच्या कुमार संगकाराला मागे टाकले आहे. धोनीने ४१९ मॅचमध्ये १४० स्टंपिंग विकेट घेतल्या आहेत.

श्रीलंकेच्या कुमार संगकारा याने ५९४ मॅच मध्ये १३९ स्टंपिग विकेट नोंदविल्या आहेत. धोनीने ४१८ मॅचमध्ये १३८ स्टंपिग केले होते. ऑस्ट्रेलियातील टी ट्वेंटी सिरीजमधील सामन्यात धोनीने युवराजसिंगच्या बॉलवर ग्लेन मॅक्सवेला स्टंपआऊट करून संगकाराच्या विक्रमाची बरोबरी केली व याच मॅचमध्ये रविंद्र जडेजा याच्या चेंडूवर जेम्स फॉकनर स्टंप करून नवीन विक्रमाची बरोबरी केली. त्यामुळे ऑस्ट्रेलियातील टी ट्वेंटी सिरीज धोनी साठी डबल धमाका ठरली.