खेळ व विविध कलांमध्ये छंद जोपासल्यास ताणतणाव दूर होतो- डॉ. दिलीप पांढरपट्टे

0
9
????????????????????????????????????

विभागीय महसुल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे उदघाटन

       वाशिम, दि. 31 – गेल्या दोन वर्ष भयावह कोरोनाचा काळ आपण पाहिला आहे. सद्यस्थितीत कोरोना संसर्गाचा प्रमाण कमी झाला असल्याने आपण एकमेकांना भेटू लागलो आहे. त्यामुळे या विभागीय महसुल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आला आहे. तंदुरुस्तपणा शरिराचाच नाही तर, मनाचा तंदुरुस्तपणा देखील आवश्यक आहे. महसूल विभागात काम करीत असतांना अधिकारी व कर्मचाऱ्यांना ताणतणाव येत असतो. कोणता दिवस कसा निघेल हे सांगता येत नाही. आयुष्यातील ताणतणाव दूर करावयाचा असेल तर, प्रत्येकांनी खेळासाठी वेळ देणे गरजेचे आहे. खेळाबरोबर इतर छंदही असणे आवश्यक आहे. साहित्य, खेळ व विविध कलांमध्ये छंद जोपासणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ.दिलीप पांढरपट्टे यांनी केले.

          तीन दिवशीय विभागीय महसुल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल,वाशिम येथे आयोजित करण्यात आले आहे.या स्पर्धेचे उदघाटन आज. 31 डिसेंबर रोजी विभागीय आयुक्त डॉ.दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी बुलडाणा जिल्हाधिकारी एच.पी. तुम्मोड,जिल्हा पोलीस अधिक्षक बच्चन सिंह, उपायुक्त (सामान्य) संजय पवार, उपायुक्त (पुनर्वसन) गजेंद्र बावणे,अप्पर जिल्हाधिकारी शहाजी पवार,सहायक आयुक्त विवेक काळकर व श्यामकांत मस्के यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

          डॉ. पांढरपट्टे पुढे म्हणाले,या तीन दिवशीय खेळात कोण हारतो व कोण जिंकतो याचा विचार न करता आपला स्वाभाविक खेळ आपण खेळावे.जो मनापासून खेळ खेळतो तो जिंकतोच. खेळांमुळे माणसाला नवीन ऊर्जा मिळते.खेळात आणि नोकरीमध्ये फरक असतो.खेळात सर्व काही माफ असते,परंतू नोकरीमध्ये माफ नसते. त्यामुळे नोकरी प्रमाणिकपणेच करावी असे त्यांनी सांगितले.यावेळी डॉ. पांढरपट्टे यांनी मै इतने हिस्सो मे बट गया हॅू की मेरे हिस्से मे कुछ बचाही नही.ही शायरी सांगितली.

????????????????????????????????????

          यावेळी यवतमाळ उपजिल्हाधिकारी प्रमोद दुबे,अकोला उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, वाशिम निवासी उपजिल्हाधिकारी कैलास देवरे,अकोला निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, अमरावती निवासी उपजिल्हाधिकारी विवेक घोडसे, बुलडाणा निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, यवतमाळ निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व्यवहारे, वाशिम उप जिल्हा निवडणूक अधिकारी संदिप महाजन, उप जिल्हाधिकारी (भुसंपादन- 2) नितीन चव्हाण, उप जिल्हाधिकारी (भुसंपादन-1) श्रीमती सुहासीनी गोणेवार, वाशिम उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत, जिल्हा पुरवठा अधिकारी तेजश्री कोरे, जिल्हा क्रीडा अधिकारी लता गुप्ता, जिल्हयातील सर्व तहसिलदार, नायब तहसिलदार व  अधिकारी- कर्मचारी यांची उपस्थिती होती.

         मान्यवरांच्या हस्ते प्रारंभी दिप प्रज्वलन करुन क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. यावेळी ध्वजारोहण व क्रीडा ज्योत (मशाल) प्रज्वलीत करण्यात आली.

          श्री.तुम्मोड यांनी खेळाडूंना खेळाविषयी शपथ दिली.श्री. बच्चनसिंह यांनी उपस्थित सर्व खेळाडूंना आपले स्वाभाविक खेळ खेळण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

          श्री. पवार यांनी या तीन दिवशीय खेळ महोत्सवात सर्व सहभागी खेळाडूंनी खेळाडू वृत्तीने सहभागी व्हावे, जीवनात खेळाचे महत्व असून, खेळामुळे आरोग्य चांगले राहून शारिरीक व मानसिक आरोग्य् चांगला राहतो. जीवनातील ताणतणाव खेळामुळे कमी होतो.सर्व खेळाडूंनी खेळाडू वृत्तीने खेळ खेळावे व पदकाचे मानकरी बणावे.असे त्यांनी सांगून शुभेच्छा दिल्या.

         यावेळी राणी लक्ष्मीबाई शाळेचे शिक्षक मोहन शिरसाठ यांना सावित्रीबाई फुले गुणगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल आणि‍ जिल्हाधिकारी कार्यालयातील लेखाधिकारी युसूफ शेख यांना लोहपुरुष पुरस्कार मिळाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.

         कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मोहन शिरसाठ व मंगरुळपीचे येथील तलाठी प्रिती मेहकर यांनी केले. आभार निवासी उपजिल्हाधिकारी कैलास देवरे यांनी मानले.