चिरचाळबांध येथील पटेल हायस्कूलमध्ये ग्रीष्मकालीन शिबिराचे आयोजन

0
10

आमगाव,दि.१८ः बहुजन हिताय जगत शिक्षण संस्था गोंदिया द्वारा संचालित  हरिहर भाई पटेल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय चिरचाळबांध येथे परिसरातील विद्यार्थ्यांचा बौद्धिक शारीरिक मानसिक आणि भावनिक विकास व्हावा यासाठी ग्रीष्मकालीन शिबिराचे उद्घाटन प्राचार्य बन्सीधर शहारे यांच्या अध्यक्षतेखाली केन्द्रप्रमुख गुलाब भुसारी यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जि.प.वरिष्ठ के.प्रा.शाळा चिरचाळबांधचे मुख्याध्यापक खापर्डे ,जि.प.प्राथ.शाळा खुर्शीपारचे मुख्याध्यापक सुनील अंबुले,जि.प.प्राथ.शाळा बासिपार मुख्याध्यापक रामटेके,जि.प.किळंगीपार श्री अंबादे,डि.बी.चव्हाण आणि हरिहरभाई पटेल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय चिरचाळबांध येथील सर्व कर्मचारी तसेच या ग्रिष्मकालीन शिबिराला नियमित मार्गदर्शन करणारे राज्यस्तरीय खेळाडू कार्तिक बिसेन, दुर्गाप्रसाद वंजारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.धर्मेंद्र मेहर यांनी केले तर आभार प्रा.आर.एच.बांदरे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व कर्मचारी तसेच विद्यार्थी यांनी प्रयत्न केले.