अनुराग ठाकूर बीसीसीआयचे नवे अध्यक्ष

0
7
मुंबई, दि. २२ – बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. ४१ वर्षीय ठाकूर  बीसीसीआयचे सर्वात युवा अध्यक्ष ठरले आहेत. ठाकूर यांची अध्यक्षपदावर बिनविरोध निवड जवळपास निश्चित मानली जात होती. रविवारी मुंबईत झालेल्या बीसीसीआयच्या विशेष सर्वसाधारण बैठकीमध्ये त्यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
सध्या सचिव म्हणून बीसीसीआयची धुरा सांभळत असलेले ठाकूर यांना पूर्व विभागाकडून अध्यक्षपदासाठी उमेदवारी मिळाली होती. या पदासाठी आता पूर्व विभागाचा क्रमांक आहे. त्यामुळे ठाकूर यांच्या नावाची केवळ औपचारिक घोषणा होणे बाकी होते. विशेष म्हणजे, लोढा समितीच्या शिफारशींना लागू करण्याचा दबाव बीसीसीआयवर असताना ४१ वर्षीय ठाकूर या पदाचा कारभार सांभाळतील.